अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
१०० दिवसीय कृती कार्यक्रम अंतर्गत नागपूर येथील नझूल भाडेपट्टधारकांची मालकी हक्काच्या जागेची स्वप्नपूर्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मालकी हक्क भोगवटा प्रमाणपत्र बहाल
अभय’ योजनेंतर्गत व ‘सर्वांसाठी घरे’ धोरणांतर्गत पट्ट्यांचे वाटप
नागपूर दि. ६ :- कोणताही व्यक्ती घरावाचून वंचित राहू नये या व्यापक भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या 100 दिवसीय कृती कार्यक्रम अंतर्गत आज नागपूर येथील एकूण 578 लोकांच्या मालकी हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती झाली. यातील प्रातिनिधिक लाभधारकांना नझुल जमिनीचे मालकी हक्क भोगवटा प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहाल करण्यात आले.
प्रत्येकाच्या घरांची स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, सर्वांसाठी घरे, अभय योजना साकारली. याला जोड देत शासनाच्या 100 दिवसीय कृती कार्यक्रम अंतर्गत नागपूर महानगरात निवासी प्रयोजनार्थ भाडेपत्त्वावर दिलेल्या नझुल जमिनीचे मालकी हक्क भोगवटा धारकांना देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी नागपूर शहरात विवीध ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने शिबीरे घेतली. यात एकुण 578 प्राप्त झाले. सदर अर्जावर मंजुरीची कार्यवाही करण्यात आली. यामुळे 60 ते 70 वर्षापासुन निवास असलेल्या भुखंड धारकांना त्यांचा मालकी हक्क प्राप्त झाला.
“सर्वासाठी घरे” या अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागातील नझुल जमिनीवर अतिक्रमण करून रहिवास करणाऱ्या अधिसुचित झोपडपट्टी मधील गरजु व लाभार्थी नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जमिनीचे अंतिक्रमण नियमानुकूल करून शासनाच्या 100 दिवसीय कृती कार्यक्रम अंतर्गत नझुल विभागाकडुन पट्टे देण्याचे काम सूरू आहे. त्यापैकी मौजा सिताबर्डी (मरियमनगर) येथील गरजु व लाभार्थी नागरीकांचे पट्टे तयार करण्यात आलेले आहेत. तेथील लोकांना प्रातिनिधिक पट्टे वाटप वाटपवेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी बगळे संजय बंगाले, सुनिल हिरनवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनातर्फे ई-नझूल ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या माध्यमातून या कामाला गती देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी सांगितले.
*’अभय’ योजनेंतर्गत भोगवटादार वर्ग-1 चे हे आहेत प्रातिनिधिक आदेश धारक*
बन्सीलाल नारंग, मंजु अशोक परशरामपुरीया व इतर. साई अंकुर अपार्टमेंटतर्फे गाळेधारक रुचिर कुमार अग्रवाल व इतर. द्वारकामाई अपार्टमेंटतर्फे गाळेधारक बिनोबेन पटेल, प्रशांत सुरेश बखले व इतर.
*’सर्वांसाठी घरे’ धोरणांतर्गत पट्टे धारक*
मॉरिस आरिकस्वामी मायकल व कारमेल मॉरिस मायकल, फिरोजखान मुनीरखान व श्रीमती अफसाना फिरोजखान, रुपा सुखलाल नानोटकर, महेंद्र सुखलाल नानेटकर, आनंद नारायण झंझोटे व रश्मी आनंद झंझोटे, राजेश रमेश तुर्केल व रिना रमेश तुर्केल, रमेश दुर्गा तुर्केल व शिला रमेश तुर्केल, अशोक आनंदराव झाडे व किरण अशोक झाडे, विशंभरनाथ रामराज शाहु व श्रीमती पुष्पा विशंभरनाथ शाहु, रंजित छोटेलाल गौरे.
