अजिंक्य महाराष्ट्र म्युझिक सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
वृक्षवल्ली सेवाभावी संस्था संचलित संजीवनी वृद्धाश्रम ,संजीवनी चारिटी क्लिनिक उद्घाटन सोहळा
प्रतिनिधी -सारंग महाजन
लोणावळा : वृक्षवल्ली सेवाभावी संस्था संचलित संस्थेच्या सर्व सदस्यांनी,संजीवनी वृद्धाश्रम व संजीवनी चॅरिटी क्लिनिक चालू करण्याचा मानस धरून याची सुरुवात आज गुडिपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी
कार्ला(लोणावळा) ता. मावळ, जि. पुणे येथे करण्यात आली,असून या वृद्धाश्रमात फक्त अनाथ व्यक्तींचेच संगोपन करण्यात येणार आहे, यावेळी स्वामी भारतानंद सरस्वती महाराज (महामंत्री अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र) यांच्या हस्ते पूजन करून उदघाटनाला सुरुवात केली यावेळी कार्ला गावच्या आदर्श सरपंच दीपाली ताई हुलावळे,डॉ. आदित्य पतकराव (भारत सरकार प्रा. रेल्वे सल्लागार समिती )उपसरपंच किरण हुलावळे, विष्णू हुलावळे, विनोद हुलावळे,, मुकुंद तिकोने, डॉ. दत्ता तपसे (वैद्यकीय अधिकारी, कार्ला) ,वृक्षमित्र अरुण पवार, आरोग्यदूत अमोल लोंढे,ओजल मायक्रो सर्व्हिस फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अमर शिंदे, वृक्षवल्ली सेवाभावी संस्थेचे सचिव राहुल केंद्रे, रमेश तपसे, सौगंध सोनवणे, लखन जावळे, सतीश चांबारे, आरोग्य सेवक श्री विशाल कांदे, आरोग्य सेवक पंकज दांडगे,बाबूलाल मोहोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते
