नमस्कार मुद्रेत उभे राहण्याचा उपक्रम
गुढीपाडव्याच्या सकाळी आकाशवाणी चोकातील चिमुकले दत्त मंदिराजवळ आज नमस्कार मुद्रेत उभे राहण्याचा उपक्रम करण्यात आला. पावसाळ्यात डोंगर माळराणांवर बीज प्रसाराचे कार्य करणारे मनोज चंद्रात्रे, यांच्यासह प्रदीप जोशी, जितेंद्र भावसार यांनी उपक्रमात सहभाग घेतला होता
विश्व भरात संरक्षण, तपासणी, देखरेख यांसारख्या निरूत्पादक गोष्टींवरील गरजेपेक्षा अधिकची खर्च करावी लागणारी साधन संपत्ती, पैसा, वेळ, मनुष्यबळ सोबतच स्वार्थामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती चा अतोनात उपसा करून पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्यातील स्वार्थ, लोभ , अन्याय, शोषण, मत्सर, लबाडी या वृत्ती कमी करायला हव्यात, कृपया विचार व्हावा…ही मानव समुहाकडे प्रार्थना करण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला… मागील वर्षीही तो करण्यात आला होता.
