भु-प्रमाण केंद्रामुळे भुमि अभिलेख विभागाच्या सेवा ऑनलाईन
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर कार्यालयातही भू-प्रमाण केंद्राची आजपासून सूरवात
नागपूर, दि 04 : भूमि अभिलेख विभागाच्या सर्व सेवा भू-प्रमाण केंद्रामार्फत आजपासून ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज 30 भू-प्रमाण ऑनालाईन सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील नगर भूमापन अधिकारी वर्ग 1 कार्यालयात या ऑनलाईन सेवेच्या उद्घाटन जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख भूषण मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
भू-प्रमाण केंद्राच्या ऑनलाईन सुविधांमध्ये नागरिकांकरिता जागेचे मोजणी अर्ज, फेर फार अर्ज, वारस प्रकरणे, ऑनलाईन पद्धतीने भरल्याची तसेच मिळकत पत्रिका काढणे, सातबारा उतारा काढणे व फेर फार उतारा यांच्या नकला सुलभ पद्धतीने पुरविण्याची सुविधा या केंद्रामार्फत आजपासून उपलब्ध झाली आहे. या ऑनलाईन सुविधेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिकक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख प्रदेश नागपूरचे भूषण मोहिते, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 चे प्रशांत हांडे यांनी केले आहे.
नगर भूमापन अधिकारी क्र 1 नागपूर या कार्यालयात भू-प्रमाण केंद्राची संकल्पना भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. यासाठी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अभय जोशी यांनी सहकार्य केले. या उपक्रमाबद्दल नगर भूमापन अधिकारी प्रशांत हांडे यांनी प्रस्ताविकात या केंद्राच्या दैनंदिन कामाबाबत प्रास्ताविकात माहिती दिली. यावेळी नगर अधिकारी कार्यालयाचे उपअधिक्षक भूमि अभिलेख सतिश पवार तसेच ग्रामीणच्या उपअधिक्षक श्रीमती दिपाली सोनसरे यावेळी उपस्थित होते.
