पांडुरंग शेलार, समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी शंकर जोग पुणे
पुणे : संविधान हक्क परिषद व मंत्रालय वार्ता यांचे वतीने इंजि. पांडुरंग शेलार, माजी कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना नुकतेच मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. शेलार यांनी सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना “सन्मानचिन्ह” देवुन गौरविण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालय, मुंबई येथे हा गौरव समारंभ दिनांक २९ मार्च २०२५ रोजी पार पडला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा. शरदचंद्र पवार, मा. खासदार चंद्रकांत हंडोरे, अॅङ अनिल अहिरे, महागायिका निशाताई भगत, डॉ. संजीवनी कांबळे, इजि. पांडुरंग शेलार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील एक आदर्श संविधान निर्मिती केली. त्यामुळे श्रीलंका, चीन व पाकीस्तानच्या तुलनेत भारत देश एकसंघ व सुरक्षित ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय व मूलभूत हक्क भारतीयांना बहाल केले असले तरी देशाच्या स्वातंत्रयाला ७५ वर्षे पूर्ण झाली तरी सर्व सामान्यांना अद्यापही त्यांच्या मूलभूत न्याय व हक्कापासून वंचित रहावे लागत आहे ही दुर्दैवाची बाब असल्याची खंत मा. शरदचंद्र पवार साहेब यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. दामोदर खोरे विकास प्राधिकारणाची स्थापना तसेच भाक्रानांगल धरणाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्यामुळे पंजाब, हरियाणातील ९८% क्षेत्र ओलीताखाली आलेले आहे. संविधान निर्मिती बरोबरच भारताच्या जल व उर्जा क्षेत्राचा भक्कम पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्रयपूर्व काळातच रोवला असल्याचे पवार यांनी नमूद केले.
डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या उत्कृष्ट संविधान निर्मितीमुळे भारत देशाची लोकशाही दिवसेंदिवस जिवंत व परिपक्व होत असल्याचे विचार पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
