हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ नेहा भोसले यांची रायगडला बदली, तर अंजली रमेश हिंगोली जिल्ह्याच्या नव्या सीईओ हिंगोली जिल्ह्यात कायम प्रयत्नशील राहणार
संभाजी पुरीगोसावी (हिंगोली जिल्हा ) प्रतिनिधी.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला, यावेळी अवघ्या काही वेळातच सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली त्यांनी सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला, हिंगोली जिल्हा परिषदेच्या नेहा भोसले यांच्या जागेवर अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या मध्य प्रदेश केंडर मधून महाराष्ट्रात दाखल झाल्या होत्या, मात्र त्यांच्या बदलीचे आदेश मागील आठवड्यात प्राप्त झाले होते, मात्र मार्च अखेरमुळे नेहा भोसले यांनी 31 मार्चपर्यंत कारभार सांभाळला होता, पहिल्याच दिवशी सत्कार आणि कार्यक्रमानंतर अवघ्या काही वेळातच जिल्हा परिषद अंतर्गत विभागाचा आढावा घेवुन नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख करून दिल्याने त्यामुळे आता हिंगोली जिल्हा परिषदेचा कारभार हा चांगलाच गतिमान होणार असल्याचे बोलले जात आहे, तर मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले या ही हिंगोली जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील ठरल्या, त्यांची नव्याने रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नुकतीच बदली झाली आहे
