सातारा तालुका पोलीसांनी चोरीला गेलेल्या चार दुचाकी केल्या हस्तगतः-(सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी पथकाची दमदार कामगिरी)
सातारा:दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी सातारा तालुका पोलिसांनी चोरीस गेलेल्या चार दुचाकी हस्तगत केल्या.
सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 18/03/2015 रोजी फिर्यादी बुरज चंद्रकांत चोरट रा.लिब ता.जि. सातारा यांनी लिब गावचे हददीतील विनल एन्टरप्रायजेस चे पार्किंगमधुन हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस क्रमांक एमएच 11 सीएन 4413 व दिनांक 15/03/2025 रोजी फिर्यादी हिदायतुल्ला हजु शेख रा. मोळाचा ओढा ता.जि. सातारा यांनी दिव्यनगरी गावचे हददीतील पारटे किराणा दुकानाच्या समोरुन होंडा कंपनीची अॅक्टीवा क्रं एमएच 11 सि.एक्स 4094 तसेच सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील दिनांक 12/02/2025 रोजी फियांदी गजानन रामचंद्र दिक्षीत रा. संगमनगर सातारा यांनी राहते घरासमोरुन बजाज डिस्कव्हर क्रमांक एम 11 बीसी 0385 तसेच पुसेगाव पोलीस ठाणे हददीतुन चोरीस गेलेलो हिरोहोंडा कंपनीची स्पेलंडर ही ह्या गाड्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून घेऊन गेल्या बाबतचे गुन्हे दाखल करण्यात होते.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक , सातारा, समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक , सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याने सदर चोरीस गेलेले वाहने हे तीन संशईत इसम विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील पो.ह..दादा स्वामी यांना मिळाली होती. सदर माहितीच्या पडताळणी दरम्यान सातारा तालुका पोलीस ठाण्याचे डी. बी. पथकास मौजे लिंब याठिकाणी तीन संशयित इसमांना दुचाकीसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केलो असता चौकरशी दरम्यान सदर इसमाने चार दुचाकी चोरी करुन घेऊन गेलेची कबुली दिल्याने सदर गुन्हयामधील इसनास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर मिळून आलेल्या दुचाकींची किंमत 1,10.000/-रु असुन सदर चोरीचे गुन्हे सातारा तालुका पोलीसांनी उघड केले असून
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सातारा, समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलोस ठाण्याचे चे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे, पो.ह. दादा स्वामी, पो.ह. शिखरे, पो.ह. गायकवाड, पो.ना. प्रदिप मोहिते, पो.कों.संदिप पांडब, पो.कों धीरज पारडे यांनी केली असता.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
