एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या मस्तवाल आणि मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली

पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या मस्तवाल आणि मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली

प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
पुणे:

गर्भवती महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यावर या महिलेस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. “आधी दहा लाख रुपये भरा आणि मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा” असे तेथील पदाधिकाऱ्यांनी सुनावले. या महिलेचा नाईलाज झाला आणि इतर हॉस्पिटल्सची शोधाशोध सुरू झाली. पण, तोपर्यंत त्या भगिनीचा मृत्यू झाला. मानवतेला कलंक असलेल्या संबंधित हॉस्पिटलवर तातडीने गुन्हा दाखल करावा. संबंधितांवर कठोर कारवाई करावी. त्या निष्पाप मातेला न्याय मिळाला पाहिजे.
‘आधी 10 लाख भरा तरच उपचार’, ..अन् गर्भवतीनं जीव गमावला, पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, नेमंक काय घडलं?
दहा लाख रुपये भरल्यावरच डिलिव्हरी करणार अशी मुजोरी पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केली आहे आणि त्यात गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसेचे पती भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे आहेत. आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच दहा लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झाला.
सात महिन्याच्या गर्भवती तनिषा भिसे यांना 28 मार्चला रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना आणलं. आधी दहा लाख रुपये भरा तरच ॲडमिट करू असं रुग्णालयाने सांगितल्याचा आरोप आहे. तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवून देखील उपचाराला नाकार दिल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. तिथे दोन ते तीन तास वाया गेले अखेर कुटुंबियांनी तनिषाला सूर्या हॉस्पिटलमध्ये आणलं. 30 मार्चला तनिषा भिसे यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला पण त्यांची तब्येत बिघडली. 30 मार्चला सूर्या हॉस्पिटलनं मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवलं आणि 31 तारखेला त्यांचा मृत्यू झाला. मृत पावलेली महिला तनिषा भिसे यांचे पती हे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए आहेत. अमित गोरखे यांनी देखील दिनानाथ हॉस्पिटलवर आरोप करत विधानसभेत मुद्दा उचलणार असल्याचं म्हटलं आहे. बघा स्पेशल रिपोर्ट…

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link