अवकाळी पावसाचा वीज यंत्रणेला फ़टका
नागपूर, दि. 2 एप्रिल 2025: – नागपूर शहर आणि परिसरात बुधवारी (दि.2) च्या मध्यरात्री वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज वितरण यंत्रणेला चांगलाच फ़टका बसला. महावितरण कर्मचा-यांनी लगेच दुरुस्तीन कामाल सुरुवात करीत बहुतांश भागातील वीजपुरवठा अवघ्या काही तासांतच पुर्ववत केला.
बुधवारी रात्री 1.30 नंतर झालेया या अवकाळी पावसामुळे शहरातील पार्वतीनगर, रामेशवरी, अभयनगर, बेसा, मानेवाडा, रामबाग, महाल, सक्करदरा, न्यु सुभेदार, जानकीनगर, भगवाननगर, उमरेड रोद, सुतगिरणी. वाठोडा, बगडगंज, श्रीकृष्णनगर, वाडी, त्रिमुर्तीनगर, छत्रपतीनगर, सोमलवाडा, मनिषनगर आदी भागात अनेक रोहीत्र नादुरुस्त झाले, वीज खांब, वाहिन्यांवर झाडांच्या फ़ांद्या तुटून पडल्याने या भागातील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला होता, वाडी परिसरात तर ग्वीज खांबावरील अनेक डिस्क नादुरुस्त झाल्या होत्या, अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या, वीज खांब वाकडे झाले. या वादळाचा सर्वाधिक फ़टका महावितरणच्या महाल विभागाला बसला. महावितरण कर्मचा-यांनी त्वरीत दुरुस्तीचे काम हाती घेत बहुतांश भागातील वीजपुरवठा पहाटेपर्यंत सुरळीत करण्यात यश मिळविले.
आज बुधवार असल्याने अनेक बागात सकाळच्या वेळी देखभाल व दुरुस्तीच्या कांचे पुर्वनियोजन करण्यात आले होते, त्यावेळी देखील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करण्यात आले
