प्रतिनिधी : गोपाळ भालेराव.
बीड: आज दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी बीड येथील सभेत महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठं वक्तव्य केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पण ही योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते, मंत्र्यांतर्फे देण्यात आलं. आता अजित पवारांनी याबद्दल मोठं विधान केलं आहे.गेल्या वर्षी जुलै महिन्यात अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ‘ जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात.आतापर्यंत एकूण नऊ हफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी दिल होते. विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आलं. विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन आता 3 ते 4 महिने होत आले. मात्र त्यानंतरही लाडक्या बहिणींना दरमहिना 2100 रुपये मिळालेले नसून ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचारत आहेत.विरोधकांनी तर या मुद्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पण ही योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते, मंत्र्यांतर्फे देण्यात आलं. पण तो दिवस कधी उजाडणार हे काही स्पष्ट झालेलं नाही.
आता याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं, सूचक विधान केलं आहे. लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणारा असं अजित दादा म्हणाले. पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना 2100 नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेले नसून ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. बीडमधील कार्यक्रमात ते बोलत होते.
