पत्रकार सामाजिक र्कार्यकर्ते श्री. कांता मानु राठोड यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
३० मार्च २०२५ रोजी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर या संस्थेचा ११ वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्री.कांताभाऊ राठोड पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले
मा. डॉ. राजेश गायकवाड, सदस्य , महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ,मुंबई, यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले .
दिनांक 30 मार्च 2025 ला विदर्भ साहित्य संघ नागपूर येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यामुळे वेगवेगळ्या भागातील साहित्यीक, लेखक,कवी, पत्रकार,सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनघलक्ष्मी दुर्गा, डॉ.स्मिता भंगाळे मॅडम , यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कांताभाऊ राठोड हे पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात कामकाज आहे ते समाजातील विविध क्षेत्रातील विविध संघटनेचे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या पदावर कार्य करत आहेत तसेच झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत गरजू ,अपंग ,दिन दुबळे, वयोवृद्ध लोकांना, मदत करतात व त्यांच्या समस्या जाणून त्याचे निरसन करतात त्याचप्रमाणे पर्यावरण विषयक झाडे लावा झाडे जगवा यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जन जागृती करतात.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. दीपक कुमार खोब्रागडे होते.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. डॉ. प्रकाश करमाडकर, कुलगुरू, आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, त्रिपुरा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. जगन कराडे , समाजशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ,मा. डॉ. विद्याधर बनसोड , सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत, चंद्रपूर ,मा. डॉ. सुनील रामटेके ,सुप्रसिद्ध नाटककार व साहित्यिक, मुंबई मा. शेगोकर ,विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय, मुंबई ,मा.डॉ. विलास तायडे, सुप्रसिद्ध साहित्यिक, अकोला, मा. बबीता डोळस, सुप्रसिद्ध अभिनेत्री ,नागपूर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. भूपेश पाटील यांनी केले. भूमिका डॉ. रवींद्र तिरपुडे यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल काळबांडे , डॉ. शंकर चांदेकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. काजल गायकवाड यांनी केले .
