अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी शंकर जोग
रिपब्लिकन बहुजन परिषदेचे प्रदेश महिला अध्यक्षा देविका चव्हाण यांना राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार प्रधान,
संविधान हक्क परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक वर्ष अन्याय अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चा आंदोलन करून अनेकांना न्याय देण्याचे काम करणारे रिपब्लिकन बहुजन परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा देविकाताई चव्हाण यांना राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी कृषी मंत्री, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि माजी समाज कल्याण मंत्री, खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह मुंबई येथील यशवंतराव चव्हाण भवन मध्ये देऊन सन्मानित करण्यात आला, यावेळी माजी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव, रिपब्लिकन बहुजन परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप भंडारी, साजिरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग शेलार, डॉ संजीवनी कांबळे, मंत्रालय वार्ता या वृत्तपत्राचे संपादक अनिल अहिरे, गायिका निशाताई भगत, आ दि यावेळी उपस्थित होते,
