श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित मधु ताराचे भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
संपादकीय
दिनांक.31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वामी समर्थ सेवा परिवार मंदिर साडेसतरा नळी हडपसर पुणे येथे भव्य* *मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.*
*मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.मधु तारा *पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी नियोजन केले.*
*स्वामी समर्थ सेवा परिवाराचे प्रमुख श्री घनश्याम दादा जगताप यांनी आणि सेवा परिवाराच्या सर्व पदाधिकारी यांनी शिबिराचे उत्तम नियोजन केले.*
*पुण्यातील राज्यात प्रसिद्ध असणारे एच.व्हि. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.*
*स्वामींच्या प्रकट दिनानिमित हजारो भक्तांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच असंख्य वृद्ध माता बंधू भगिनींचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नावे रजिस्टर करण्यात आली.*
*या शिबिराला H V देसाई हॉस्पिटलचे श्री दिनेश सर. श्री प्रसाद सर.साडेसतरा नळी ग्रामपंचायत सदस्य श्री महेश दादा तुपे.K V 2 कंपनीचे मालक श्री धीरजजी लोहार.वेलेंटिना कंपनीचे डायरेक्टर श्री* *शशिकांतजी जगताप.रूपाली ताई कवडे.जगद्गुरु श्री नरेंद्र नाथ महाराजांच्या संप्रदायातील भक्त गण तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते.*
*या प्रसंगी मधु तारा पुणे शहराध्यक्षा म्हणून श्रीमती शारदाताई शेंडकर यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्ती पत्र मधु तारा प्रमुख.श्री दिनेश सर.श्री जगताप दादा.श्री धीरज सर.श्री दांगडे सर यांच्या हस्ते देण्यात आले.*
*या वेळी डॉक्टर्स आणि टेक्निशियन टीमने खूपच छान प्रतिसाद दिला.*
*या वेळी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही मानव सेवा रुग्ण सेवा अखंडित घडत राहो असे मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे म्हणाले.
