एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंगणी उपकेंद्राला मिळाले आयएसओ मानांकन

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

हिंगणी उपकेंद्राला मिळाले आयएसओ मानांकन

प्रतिनिधी सतीश कडू

वर्धा, दि. 1 एप्रिल 2025: – वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्राचे अत्यंत उत्कृष्टरित्या सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आल्यामुळे महावितरणच्या नागपूर परिमंडल अंतर्गत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणी या 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्राला आयएसओ 9001:2015 आणि आयएसओ 45001:२2018 चे मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे आर्वी आणि पिंपळगाव पाठोपाठ आतएसओ नामांक्न मिळविणारे हिंगणि हे वर्धा जिल्हातील महावितरणचे तिसरे उपकेंद्र ठरले आहे.

जिल्ह्यातील वर्धा विभागा अंतर्गत हिंगणी उपकेंद्रातूवरील सर्व वीज ग्राहकांना 24 X 7 वीज वितरण, 33/11 केव्ही उपकेंद्र, उच्चदाव व लघुदाब वाहिन्या, आणि वितरण रोहीत्रांच्या ग्राहक सेवांचे संचालन आणि देखभाल यासाठी आयएसओ 9001:2015 तर व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठी आयएसओ 9001:2015 असे मानांकन देण्यात आले आहे. महावितरणच्या ‘इज ऑफ ‍लिव्हिंग’ अर्थात ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. आयएसओ मानांकनानुसार उपकेंद्रातील उत्कृष्ट कार्याचा थेट लाभ ग्राहकांना उच्च दर्जाची वीज सेवा देण्यासाठी होणार आहे. या उपकेंद्रासाठी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या उत्कृष्ट कामातून प्रेरणा घेत इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपआपल्या उपकेंद्रात पूर्ण क्षमतेने उत्कृष्ट काम केल्यानेच हे मानांकन मिळालेल्ले आहे.

या यशस्वीतेसाठी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि वर्धा प्रविभागाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मछले, सेलू उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संदीप शिरपूरकर, कनिष्ठ अभियंता गौरव वाटकर तसेच हिंगणी उपकेंद्रातील सर्व यंत्रचालक, तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक व बाह्य स्त्रोत कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले आहेत. महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल मुख्य अभियंता दिलीप दोडके अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांचेसोबत तिनही विभागातील कार्यकारी अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.

फ़ोटो ओळ – आयएसओ मानांकन प्राप्त वर्धा जिल्ह्यातील महावितरणचे हिंगणी येथील 33/11 केव्ही उपकेंद्र

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link