अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
संपादकीय अपडेट (जळगाव) समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली युवा ग्रामीण पत्रकार संघावर एरंडोल तालुक्यातील वरखेडीगावाचे चे भूमीपुत्र पत्रकार समाधान पाटील यांची युवा ग्रामीण पत्रकार संघात जळगाव जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली गेल्या 10ते १5 वर्षांपासून सामाजिक, शैक्षनीक, धार्मिक राजकिय, पत्रकारीता, समाज सेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी बाबत व तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,ओल मिडिया असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ,द जर्नलिस्ट एसोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ, पोलिस मित्र समिती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अशा या सर्व संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून समाधान पाटील हे कार्यरत आहेत तसेच, साप्ताहिक वास्तवपोस्ट सहसंपादक, साप्ताहिक राष्ट्रहित सर्वापरी, दै.मराठवाडासाथी, दैनिक युवक आधार, महाराष्ट्र शान न्युज, दक्ष न्युज, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नशन महाराष्ट्र न्यूज व जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.
अशा अनेक कार्याची दखल घेत समाजातील न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव संतोष लांडे यांच्या शिफारशी नुसार समाधान पाटील यांची जळगाव जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. असून समाधान पाटील यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढील कार्यकारिणीस पुढील कामास तत्पर हजर राहून कार्य जोमाने करण्याचे आश्वासन दिले
या नियुक्तीने समाधान पाटील यांची सर्व स्तरातून,सामाजिक. राजकीय. शैक्षणिक. पत्रकारिता क्षेत्रातून व मित्र परिवारा कडुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे व अभिनंदन केले जात आहे…
