कर्तव्यदक्ष पत्रकार उमाताई बोचरे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्रीपदी नियुक्ती,
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी (सातारा जिल्हा)
उमाताई बोचरे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्रीपदी नियुक्त राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्लीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अब्दुल रहीम सा. यांनी यांच्या आदेशानुसार देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता जगतातील तरुण आणि तडफदार आपल्या लेखणीने अनेक नंबर दोनची आणि खोटे काम करा करणाऱ्यांचे बिंग फोडले तसेच गोरगरिबांचे असह्य लोकांचे आणि कित्येक लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारी, शासन आणि प्रशासनाच्या सर्व योजनांचा लाभ अनेक गोरगरिबांना मिळून देणाऱ्या उमा ताई बोचरे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय पत्रकार,” राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्लीच्या” राष्ट्रीय प्रभारी चंद्रशेखर जयस्वाल यांनी महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्रीपदावर त्यांची एका पत्राद्वारे नियुक्ती केल्या केल्याची बातमी परिसरांत चांगलीच पसरली आहे, त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे, अनेकांनी त्यांना शुभेच्छा व पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत सुद्धा करण्यात येत आहे ही उमाताई बोचरे यांच्या नियुक्तीची वार्ता जशी आज परिसरात गावामध्ये पसरत आहे तसतशी त्यांना दूरध्वनी वरून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यांमधून एक छोट्याशा वडनेर भोलजी या गावातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात करणाऱ्या उमाताई बोचरे यांनी आपल्या गावांमधूनच गोरगरिबांची सेवा करणे त्यांच्या अडचणीच्या कामात त्यांना सहकार्य करणे, शासकीय, अ शासकीय कार्यालयातील त्यांना लाभ मिळवून देणे शासनाच्या अनेक योजना बद्दल त्यांना माहिती देणे अनेक बँकातून तरुणांना कर्ज काढून देणे व त्याविषयी मार्गदर्शन करणे संजय निराधार योजना असो अपंगांना त्यांना शासकीय लाभ मिळवून देणे असो, अनेकांच्या घरचे वाद,कौटुंबिक वाद इत्यादी सोडविण्या साठी कसोशीनेे प्रयत्न करून अनेकांचे संसार तुटण्यापासून वाचविले आहे. उमाताई बोचरे या नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी तालुक्यांमध्ये एक उत्कृष्ट समाजसेविका म्हणूनही प्रसिद्ध आहेत त्याचाच लाभ त्यांना महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्रीपदी नियुक्ती केल्या वरून दिसून येत आहे.
उमाताई बोचरे यांना समस्त पुरीगोसावी परिवार आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडून पुढील सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत.
