अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे जिल्हा सहसंपादक – गोपाळ भालेराव
शुक्रवार दिनांक 28/03/2025 रोजी सेवानिवृत्त पोलिस मैत्री ग्रुप कात्रज ची मंथली मिटींग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गार्डन (मोरे बाग) योगा हॉल कात्रज पुणे* येथे पार पडली..
सदर मीटिंगमध्ये सुमारे 65 ते 70 सेवानिवृत्त बांधव हजर होते त्यामध्ये माहे *फेब्रुवारी 2025 व मार्च 2025 मध्ये वाढदिवस* असलेल्या
. श्री सखाराम जाधव, श्री प्रताप बिरंजे, श्री आनंद निकम
यांचा वाढदिवस थाटात पार पडला.
आजच्या या मीटिंग करता प्रमुख पाहुणे.. सामाजिक कार्यकर्त्या व सावली फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. आम्रपाली मोहिते मॅडम, व त्यांच्या सहकारी पूजा काटकर मॅडम, पूजा जैन मॅडम उपस्थित होत्या त्यांनी गोरगरीब मुलांना शिक्षण व कुटुंबांना कशाप्रकारे मदत करते याचा अतिसुंदर असा लेखाजोखा मांडला..
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री कोरेकर साहेब व श्री ठोंबरे साहेब, डॉ भवाळकर साहेब यांनी तसेच पत्रकार, झेप फाऊंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष कांताभाऊ राठोड , बापू घुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले..
तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री चेतन शर्मा ,उपाध्यक्ष मनोज पतंगे ,माझी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल माने साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आपल्या ग्रुपमधील सर्व सेवानिवृत्त पोलीस बांधव यांना पोलीस तपास साप्ताहिक यांचे तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..
वरील सर्व प्रमुख पाहुणे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यानंतर सर्वांनी गप्पागोष्टी करत समोसे जिलेबी चहा असा अल्पोपहार करून खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
.सेवानिवृत्त पोलीस मैत्री ग्रुप कात्रज.
