अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
संपादकीय अपडेट
पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडल ४च्या वतीने ‘जन सुरक्षा चषक – २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
विमान नगर, पुणे : पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडल ४च्या वतीने ‘जन सुरक्षा चषक – 2025’ दोन दिवसीय क्रिकेट चे आयोजन विमाननगर येथील सिम्बायोसिस कॉलेज ग्राऊंड वर करण्यात आले. क्रिकेट स्पर्धा सोहळ्याचा विजेता पुरस्कार समारंभ दि. 28 मार्च रोजी पुलिस आयुक्त पुणे- मा अमितेश कुमार यांच्या हस्ते संपन्नः झाला. विमानतळ पोलीस स्टेशन यांनी ‘कम्युनिटी पुलिसिंग’ और ‘कनेक्टिंग यूथ्स’ या उपक्रमा अंतर्गत जनसुरक्षा क्रिकेट चषक 2025″ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेमध्ये परिमंडळ-4 मधील एकूण 16 संघानी सहभाग नोदवला. त्यामध्ये परिमंडळ 4 मधील विमानतळ, खराडी, वाघोली, येरवडा, विश्रांतवाडी, खडकी,बाणेर पोलीस ठाणे यांनी सहभाग नोंदवला.तसेच ‘ राष्ट्रीय स्वयंसेवक पत्रकार महासंघ (पुणे)” चे यांनी देखील सहभाग घेतला होता.तसेच विमान नगर परिसरातील नामवंत स्थानिक 8 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला .सदरच्या स्पर्धा संपन्न होऊन त्यामध्ये प्रथम क्रमांक लोहगाव इलेव्हन, द्वितीय क्रमांक जे बॉईज क्रिकेट संघ रामवाडी, तृतीय क्रमांक विमानतळ पोलीस स्टेशन क्रिकेट संघ यांनी पटकावला.विजेत्या संघांना अनुक्रमे 21000/- ,11000/-,7000/- व चषक पारितोषिक प्रदान करण्यात आले.सदर स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून विमानतळ पोलीस स्टेशन संघाचे कर्णधार सपोनी विजय चंदन,उत्कृष्ट फलंदाज गणेश इथापे विमानतळ पोलीस स्टेशन संघ,उत्कृष्ट गोलंदाज अरविंद ठाकूर,जे बॉईज संघ यांना गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण पोलीस आयुक्त श्री.अमितेश कुमार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी कुमार यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडू व नागरिक यांच्याशी संवाद साधून मनोगत व्यक्त केले.
स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पोलीस उपायुक्त – हिम्मत जाधव (परिमंडळ 4) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त ( खडकी) – विठ्ठल दबडे, सहा. पोलीस आयुक्त ( येरवडा ) – श्रीमती प्रांजल सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलिस स्टेशन – अजय संकेश्वरी, येरवडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक- रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे – संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदन नगर पोलीस ठाणे – श्रीमती ढाकणे , पोलीस निरीक्षक (गुन्हे ) विमानतळ पोलीस स्टेशन श्रीमती आशालता खापरे,श्री हर्षवर्धन गाडे यांनी आयोजन केले. तसेच विमान नगर परिसरातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार संघ टीम या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
