बार्टी संस्था व अखिल भारतीय मजदूर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मेहतर बाल्मिक समाजातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न,
प्रतिनिधी शंकर जोग पुणे
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व अखिल भारतीय मजदूर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मेहतर बाल्मिक समाजातील जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी या संदर्भात येणाऱ्या अडचणी यावर एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा येरवडा येथील शासकीय सफाई कामगारांच्या मुला मुलींची निवासी शाळेमध्ये भरवण्यात आले होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली,
यावेळी प्रमुख मान्यवरांची कार्यशाळेमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेवर सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले मेहतर वाल्मिकी समाजातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न, मुद्दे, शंका, आणि अडचणी यावर त्यांचे समाधान प्रश्नांचे उत्तरे या ठिकाणी त्यांना देण्यात आली,
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनील वारे, उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख बा र्टी अनिल कारंडे, अप्पर जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख बार्टी, स्नेहल भोसले, प्रांत अधिकारी वाई जिल्हा सातारा राजेंद्र कचरे, संजय दाणे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, विभाग प्रमुख शुभांगी पाटील, कार्यालय अधीक्षक बार्टी प्रज्ञा मोहिते, प्रकल्प अधिकारी बार्टी चे सचिन गिरमे, तसेच अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ अनुपम बेगी आदि यावेळी उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक प्रशिक्षण विभाग बार्टीचे नितीन सहारे यांनी केले,
