दिलीप भालेराव यांना माविम जेडर चॅम्पियन पुरस्कारांनी सन्मानित
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव:- यावल तालुक्यातील बामणोद गावचे माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते *दिलीप पितांबर भालेराव* यांना नुकताच *महाराष्ट्र शासनाचा* अंगीकृत उपक्रम असलेल्या *महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)* यांचे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण *महिला उद्यम विकास विभाग तर्फे* सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा *_मावीम जेंडर चॅम्पियन_* पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावल पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात आज दिनांक २८/०३/२०२५ वार शुक्रवार रोजी *यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण ठाकुर यांचे हस्ते दिलीप पितांबर भालेराव यांना हा पुरस्कार देण्यात आला.* यावेळी *महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव चे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.*
महिला सक्षमीकरणसाठी, महिलांचे संवेदनशील विषय हाताळण्यासाठी, गाव पातळीवर महिलांच्या विकासाकरिता पुढाकार घेणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. मागील बऱ्याच वर्षांपासून दिलीप भालेराव हे गावासोबतच परिसरातील महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतात. कौटुंबिक वादापासून मोठमोठ्या भांडणांपर्यंत मध्यस्थी करत त्यांनी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. महिलांना पाठबळ देत अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी दिलीप भालेराव नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला महिला व बालविकास अधिकारी यावल अर्चना आटोडे, बचतगटाच्या सहयोगिनी शारदा पाटील, वंदना पाटील, छाया कोळी, अलका बाविस्कर, लेखिता साळुंखे, ज्योती सोनवणे, रोहिणी पवार, जमीला तडवी, विविध सामाजिक कार्यकर्ता महिला यांसह तालुकाभरातील महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविम व्यवस्थापक आशिष मोरे यांनी सूत्रसंचालन जावेद तडवी यांनी तर आभार हेमंत फेगडे यांनी केले.
