एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सिकलसेल तसेच जनुकीय आजारावर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज 

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सिकलसेल तसेच जनुकीय आजारावर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज

महाराष्ट्राचे  राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आवाहन*
हृदय ,यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाकरीता अत्याधुनिक उपचाराची आवश्यकता -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
एम्स नागपूरचा  पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

नागपूर 29 मार्च 2025
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्स नागपूर येथून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार  तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वा संबंधातील आजारांवर अधिक संशोधन करून आपल्या उपचारात्मक पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत असे आवाहन राज्यपाल सी .पी . राधाकृष्णन यांनी आज नागपूर येथे केले .2018 मध्ये नागपूरच्या जीएमसी( शासकीय वैदकीय महाविद्यालय )येथून सुरू झालेल्या एम्स नागपूरच्या वर्धा रोडवरील मिहान येथील कॅम्पसमध्ये आयोजित या संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते . याप्रसंगी केंद्रीय  रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी ,एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ . अनंत पंढरे , कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी उपस्थित होते .
पूर्वी फक्त दिल्लीमध्येच एम्स होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून एम्स आता   तामिळनाडू , झारखंड यासारख्या राज्यासह नागपूर आणि अनेक शहरात स्थापन झाले असून दिल्लीच्या एम्स मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहे अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली .एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली तुकडी म्हणून तुमच्या तुकडीच वर्णन हे एक इतिहास निर्माण करणारी तुकडी म्हणून या संस्थेच्या इतिहासात नोंद केली जाईल असं सांगून राज्यपालांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कधीच थांबवू नये त्यांनी या क्षेत्रातील नियतकालिकांचा अभ्यास करून यातील नव नवे संशोधन समजवून आपले ज्ञान अद्यावत करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
केंद्रीय   मंत्री नितीन गडकरी यांनी एम्समध्ये हृदय ,यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्याने असणाऱ्या थॅलसेमिया आणि सिकलसेल ऍनिमिया यावर अत्याधुनिक उपचार एम्स नागपूमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले .बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रियांना देखील महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच वैद्यकीय क्षेत्रामध्ये खाजगी सार्वजनिक भागीदारीने गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येऊ शकते असे देखील त्यांनी नमूद केले.
एम्स नागपूरच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले . त्यांनी सांगितले की 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली होती .गेल्या 6 वर्षात एम्स नागपूरने भारताच्या आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे .
एम्स नागपूरच्या दीक्षांत समारंभाची सुरुवात शैक्षणिक संचालनाने झाली . यानंतर एम्स नागपूरचे  कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी संस्थेचा अहवाल   मांडला.  गेल्या  5  वर्षाच्या काळामध्ये संस्थेने बराच मोठा पल्ला गाठला असून   आतापर्यंत एम्स नागपूरने केवळ मध्य भारतातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून आलेल्या 21 लाख  रुग्णांना बाह्य रुग्ण विभागाद्वारे उपचार उपलब्ध करून दिले आहेत एम्स मध्ये  81 अतिदक्षता कक्ष  असून  आतापर्यंत 23 हजार मोठ्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. एम्सच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मृणाल फाटक यांनी दीक्षांत समारंभाचे संचालन केले . दीक्षांत समारंभात 2018 च्या तुकडीच्या विद्यार्थीनी  डॉ . जिज्ञासा जिंदाल यांना अंतिम व्यावसायिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच कम्युनिटी मेडिसिन आणि बालरोग शास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळवल्याबद्दल डॉ. संजय पैठणकर सुवर्णपदक देण्यात आले.  डॉ. अभिजित यांना द्वितीय तर  डॉ . हिमांशू गजभिये यांना तृतीय  क्रमांक प्राप्त केल्याप्रसंगी    तसेच वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुवर्णपदक आणि  रोख पारितोषिक दिले गेले . यासोबतच 121 एमबीबीएस पदवीधारकांना आणि 24 पदव्युत्तर पदवीधारकांना डॉ . अनंत पंढरे यांनी पदवीदान केले .
या कार्यक्रमाला एम्सचे शिक्षक ,अधिकारी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link