संभाजी ब्रिगेडने आणला ग्रामसेवकाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर
प्रतिनिधी.नामदेव.मंडपे मंठा
संभाजी ब्रिगेड मंठाच्या माध्यमातून मागील अनेक महिण्यापासून ग्रामसेवक हा मुख्यालयी वास्तव्यास असावा ह्या मागणीसाठी वेळोवेळी पंचायत समितीला निवेदन असतील आंदोलन असेल त्याचबरोबर सर्वोतोपरी पाठपुरावा करण्याचं काम केले आहे.
एवढंच नाही तर हा मुद्दा घेऊन विधान परिषदेत सुद्धा आठ आमदारांनी हा मुद्दा लावून धरला आहे.
त्याचबरोबर उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून जे ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसतील त्यांच्यावर म.जि.प.जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
तरीही तालुक्यातील एकही ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसतानाही देखील शासनाची व सर्वसामान्य जनतेच्या पैशाच्या अपव्यय करण्याचे काम करत आहे.
हाच मुद्दा घेऊन संभाजी ब्रिगेड मार्फत सर्व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन ग्रामसभेच्या प्रोसिडिंग ची सत्य प्रत मिळावी या आशयाचे निवेदन देण्यात येत होते.
परंतु मागील अनेक दिवसांपासून या संघटनेचे अध्यक्ष असलेले नरेंद्र पवार यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयाला अनेक वेळा भेट देऊन
त्याच बरोबर अनेक वेळा भ्रमण ध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही हे आधिकारी कॉल घेत नसल्यामुळे
आज धोंडी पिंपळगाव या गावी गेलो असता ग्रामसेवक आधिकारी नरेंद्र त्या पवार हे मुख्यालयी राहत नाहीत हे दिसून आले.
त्याचबरोबर गावातील अनेक लोकांशी चर्चा केली असता हे आधिकारी येथे राहत नसल्याचे कळाले.
त्यांना संपर्क साधल्या नंतर मी निवेदन स्वीकारण्यासाठी येत नाही. माझी जी काही तक्रार करायची असेल ती वरिष्ठाकडे करा.अश्या उद्धट भाषेचा वापर या आधिकऱ्यानी केला.
याचाच अर्थ ग्रामसभेचा ठराव देऊन मी याच गावी राहत असल्याचा खोटा ठराव सादर करून सर्व सामान्य जनतेची त्याच बरोबर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.
जो पर्यंत अश्या मग्रूर आधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही.तो पर्यंत हा लढा चालू राहणार आहे असे संभाजी ब्रिगेड च्या वतीने सांगण्यात आले.
