गोखले रोडवरील डबल पार्किंग अडथळा: शिवसेना स्टाईल ॲक्शन
प्रतिनिधी, किशोर रमाकांत गुडेकर
दिनांक २७ मार्च, गोखले रोड जवळील शुश्रुक्षा हॉस्पिटल ते पोर्तुगीज चर्च येथे सीएनजी भरण्यासाठी डबल पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर शिवसेना स्टाईलमध्ये थेट रस्त्यावर उतरून कारवाई
दादर बीपीसीएल पंपासमोर सीएनजी भरणाऱ्या कॅब्सच्या गर्दीमुळे स्थानिक रहिवासी, आपत्कालीन सेवा वाहने व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. या अनागोंदी ला आळा घालण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलमध्ये थेट रस्त्यावर उतरून कारवाई केली!
वाहतूक कोंडीला जबाबदार पंप प्रशासनावर धडक कारवाई केली.
अवाजवी गर्दी करणाऱ्या आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या कॅबचालकांना स्पष्ट इशारा दिला आणि सहकार्य न करणाऱ्या कॅबचालकांच्या गाड्यांची थेट टायर पंचर करण्यात आले.
शिवसेनेचा स्पष्ट संदेश…लोकांना त्रास देणारी कोणतीही व्यवस्था खपवून घेतली जाणार नाही!
आंदोलनात कुणाल वाडेकर , संतोष तेलवणे , अभिजीत राणे , अजय कुसूम , चेतन राणे , स्वनिल केळशीकर , संकेत पवार व इतर पदाधिकारी उपस्तिथ होते
