शिवभक्त साहित्यरत्नडॉ. गणेश विठ्ठल राऊत पद्मश्री सन्मानाने सन्मानित..
संपादकीय
कोंढवे धावडे : पुणे- भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर्फे दिल्लीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये लेडी सिंघम संयुक्त सचिव भारतीय विश्वविद्यालय संघ म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा दिल्ली पोलीस ऑफिसर सौ. किरण शेट्टी, (लेडी सिंघम IPS ऑफिसर) मा.चिराग पासवान (मेंबर ऑफ पार्लमेंट) व मा. सौमित्र खान ( मेंबर ऑफ लोकसभा) यांच्या शुभ हस्ते डॉ . गणेश विठ्ठल राऊत यांना “पद्मश्री” या सन्मानाने सन्मानित करण्यात आले..
ज्यांनी आपल्या कामाप्रती कृतज्ञता बाळगत प्रामाणिकपणे अहोरात्र निस्वार्थ आपल्या कामाला वाहून दिलं ज्यांनी कधीच फळाची अपेक्षा केली नाही आणि आपल्या कामापासूनही ते कधी दूर हटलेही नाही त्यांच्या कामाचा आणि ते करत असलेले निस्वार्थ कार्य या सर्व गोष्टीचा विचार करत आज त्यांना “पद्मश्री” या सन्मानाने सन्मानित करत असताना आमचे हृदय ही भरून आले आहे त्यांचं कार्य दिव्यांग अपंग सामान्य गरीब या लोकांसाठी निस्वार्थ असे आहे आपल्या कुटुंबाचा त्याग करत त्यांनी आज “पद्मश्री” सन्मानापर्यंत मजल मारत आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे नाव दिल्लीच्या तक्त्यावर रोशन केले आहे आम्ही त्यांचं काम त्यांच्या कामाचा लेखाजोखा स्वतः तपासून पाहिला असता निस्वार्थ कार्य म्हणजे काय याचा अर्थ आम्हास उलगडला ते करत असलेले कार्य खरंच प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्यातून आणि कामातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्या कुटुंबाचा त्याग करत कसली आणि कोणाकडूनही कसली अपेक्षा न ठेवत त्यांनी आपल्या कार्याची ज्योत अहोरात्र तेवत ठेवली आणि आज त्या कर्माची पोहोच म्हणजे “पद्मश्री सन्मान” नाने त्यांना मिळाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही असे मत यावेळी लेडी सिंघम दिल्ली पोलिस ऑफिसर मिसेस किरण शेट्टी यांनी व्यक्त केले…
या कार्यक्रमाला मा. जगदीश मुखी ( एक्स गव्हर्नर ऑफ आसाम), सौ मीनाक्षी लेखी विदेश सांस्कृतिक राज्यमंत्री, ऑलम्पिक पदक विजेते रवी कुमार दहीया, भारताचे पैलवान सतपाल सिंह,मा. अरविंद कुमार ( मिनिस्टर ऑफ इलेक्शन हरियाणा ) मा. चंदन कुमार चौधरी ( मेंबर ऑफ दिल्ली असेंबली भा. ज.पा) मा. विजय जॉली ( पॉलिटिशियन ) व डॉ. आलो कुमार मिश्रा (जॉइंट्स सेक्रेटरी ऑफ असोसिएशन) चेअरमन डॉ. तपन कुमार सी.ई.ओ. कविता बजाज, मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कुमार, मॅनेजर बॉबी जैन, निधी निगम, रोशनी शर्मा, रक्षितसर व इतर अनेक मेंबर ऑफ पार्लमेंट चे सदस्य उपस्थित होते…
आपण करत असलेले काम जर प्रामाणिक असेल तर कुठल्याही प्रकारची कसली भीती राहत नाही आपल्या कामाप्रती आपण प्रामाणिक असणं गरजेचं आहे पोहोच मिळून मिळो कर्माची पावती जरूर मिळते असे मत “पद्मश्री” सन्मानाने सन्मानित केल्यानंतर डॉ.गणेश राऊत यांनी व्यक्त करत सर्वांचे मनस्वी आभार मानले..
