आर्वी पाठोपाठ महावितरणच्या पिंपळगाव उपकेंद्राला ‘आयएसओ’चे मानांकन
प्रतिनिधी सतिष कडू नागपूर
नागपूर/वर्धा, दि. 27 मार्च 2025: – ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्राचे अत्यंत उत्कृष्टरित्या सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आल्यामुळे महावितरणच्या नागपूर परिमंडल अंतर्गत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी पाठोपाठ हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव या 33/11 केव्ही उपकेंद्राला आयएसओ 9001:2015 चे मानांकन मिळाले आहे. काही दिवसांपुर्वीच आर्वी येथील 33/11 केव्ही उपकेंद्राला देखील 9001:2015 आणि आयएसओ 45001:२2018 चे मानांकन मिळाले असल्याने आता नागपूर परिमंडलातील दोन उपकेंद्रांनी हा बहुमान पटकाविला अहे.
वर्धा जिल्ह्या अंतर्गत हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव येथील या 33/11 केव्ही उपकेंद्रावरील सर्व वीज ग्राहकांना 24 X 7 वीज वितरण, 33/11 केव्ही उपकेंद्र, उच्चदाव व लघुदाब वाहिन्या, आणि वितरण रोहीत्रांच्या ग्राहक सेवांचे संचालन आणि देखभालीसाठी आयएसओ 9001:2015 चे मानांकन मिळाले आहे, यापुर्वी आर्वी येथील 33/11 केव्ही उपकेंद्राला देखील आयएसओ 9001:2015 आणि व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठी आयएसओ 9001:2015 असे मानांकन मिळाले आहे..
महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. आय.एस.ओ. मानकानुसार उपकेंद्रात झालेल्या उत्कृष्ट कामाचा फायदा ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याकरीता होणार आहे. या उपकेंद्रासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी आपआपल्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने उत्कृष्ट काम केल्यानेच हे मानांकन मिळालेल्ले आहे.
उपकेंद्राला सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवायचेच या ध्येयाने वर्धा मंडलच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे, वर्धा मंडलातील कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रदीप घोरुडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंकज फाळे, उपकार्यकारी अभियंता हिंगणघाट शहर उपविभाग सुरेश ताकसांडे, सहाय्यक अभियंता हिंगणघाट शहर 2 शाखा कार्यालय, राकेश राजूरकर, यंत्रचालक दिलीप मेघरे, बाह्यस्त्रोत यंत्रचालक हेमंत वडे, विक्रम नागपुरे आणि वैभव उघडे आणि उपकेंद्रातील सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, बाह्यस्रोत कर्मचारी यांनी एकसंघपणे अथक परिश्रम घेतले याबद्दल महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
