आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची वालचंदनगर पोलीस ठाण्याला सदिंच्छा भेट
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी
पुणे ग्रामीण विभागातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांनी सदिंच्छा भेट दिली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते या मागील महिन्याभरांपूर्वी पुणे शहर पोलीस दलामध्ये दाखल झाल्या आहेत, त्या मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यांतील आहेत. 2012 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी आत्तापर्यंत पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तर सातारा सोलापूर ग्रामीण या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून अतिशय उत्कृंष्ट आणि दमदार आणि नेहमीच जिल्ह्यामध्ये त्या प्रयत्नशील राहिल्या, महाराष्ट्र पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी म्हणून तेजस्विनी सातपुते यांना चांगलेच ओळखले जाते, ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली होईल त्या त्या ठिकाणी त्यांनी त्या त्या जिल्ह्यात त्यांनी सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन आपल्या कामातून वेगळीच छाप निर्माण केली आहे, कोरोना काळात देखील सातारा पोलीस अधीक्षक असताना ऐतिहासिक जिल्ह्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील राहिल्या होत्या
