अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी शंकर जोग पुणे
स्टँड – अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, शिवसेना वडगावशेरी विधानसभेची मागणी,
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदातून टीका करणारे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना त्वरित अटक करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा व याचा जोरदार निषेध शिवसेना वडगावशेरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आला, चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले होते,
यावेळी शिवसेना पुणे शहर समन्वयक शंकर संगम, शिवसेना बांधकाम सेना पुणे जिल्हा संघटक शेरसिंग राजपूत, महिला आघाडी शहर समन्वयक पद्माताई शेळके, विभाग प्रमुख नरेश धांदल, विभाग संघटक कुणाल खुळे, सामाजिक कार्यकर्ता राहुल ढाकरे, प्रभाग प्रमुख रितेश शिंदे आदि उपस्थित होते,
