इंडस्ट्रिअल अकाउंट्स एक व्यवसायिक अभ्यासक्रम आणि व्यवसाय संधी…..
प्रतिनिधी. नामदेव मंडपे मंठा जालना
जालना जिल्ह्यातील नेक्स्ट
ॲपोरचूनिटी अकॅडमी ही व्यवसायिक संस्था 1 ली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी अनेक व्यवसायिक कोर्सेस चे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत आहे.या वर्षापासून इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रिअल अकाउंट्स अँड मॅनेजमेंट,अहमदनगर यांच्या सहकार्याने या संस्थेने
” इंडस्ट्रिअल अकाउंट्स ” हा एक अभिनव अभ्यासक्रम आपल्या जिल्ह्यात सुरू करायचे ठरवले आहे.या अभ्यासक्रमातून
कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रिअल अकाउंट्स,बेसिक टॅक्सेशन,ऑडिट,स्टॉक अकाउंटिंग आणि टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या अत्यंत महत्त्वाच्या आणि हमखास नोकरी,व्यवसाय मिळवून देणाऱ्या
कोर्सेसचे प्रशिक्षण सुरू करण्याचे ठरवले आहे.हे व्यवसायिक कोर्सेसचे प्रशिक्षण घेतल्यानंतर
विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात अकाउंट्स,स्टोअर्स सामान्य प्रशासन या विभागात निश्चित नोकरी मिळू शकेल.तसेच ज्या विद्यार्थ्यांना अथवा व्यावयिकाना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांना हे इन्स्टिट्युट सर्वतोपरी सहकार्य करते.
नेक्स्ट ॲपोरचूनिटी अकादमीचे संचालक श्री प्रशांत प्रधान जालना जिल्ह्यातील विद्यार्थी आणि व्यवसायिक यांना नोकरी आणि व्यवसाय यासाठी विविध प्रशिक्षण योजना सुरू करणार असल्याचे सांगितले.
इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रिअल अकाउंट्स अँड मॅनेजमेंट,अहमदनगर आणि नेक्स्ट ॲपोरचूनिटी अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने अनेक व्यवसायिक कोर्सेस 1 ली 10 वी आणि कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना विविध शालेय कोर्सेस आणि व्यवसायिक कोर्सेसची सुरुवात गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींना सांगितले.
