अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी – श्री सिध्दार्थ धंदरे ता. चिखली जिल्हा बुलढाणा
युवा संवर्धन समिती आयोजित नागसेन प्रीमियर लीगच्या संघ निवडीची चाचणी हॉटेल मनीषा या ठिकाणी संपन्न झाली या ठिकाणी नागसेन प्रीमियर लीगच्या संघ प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये संघाचे कर्णधार तसेच संघातील खेळाडूंची ऑक्शनच्या माध्यमातून निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.बी.ए खरात सर उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आयु.मिलिंद भंडारे सर आयु. मनीष मोरे सर या ज्येष्ठ व्यक्तींच्या माध्यमातून ही निवड चाचणी पार पडली या निवडचाचणीचे मुख्य नियोजन करते अभिजय साळवे उर्फ बंडू साळवे यांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याची सूत्रे हातात घेऊन निवड चाचणीला सुरुवात केली या या निवड चाचणीसाठी संघाचे प्रमुख आयु. विनय कासारे आयु.जय बोंद्रे आयु. निलेश जाधव आयु. लालाजी खेडेकर आयु.शंतनू कुडके .. हे आपल्या संघाच्या निवडण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे मुख्य आयोजक सुमेध जाधव सर यांनी केले तसेच नागसेन युवा संवर्धन समितीचे सदस्य आयु.रामदास जाधव आयु.सचिन साळवे सर आयु. अरुण भिसे आयु.राहुल पवार सर आयु.राजेश बोर्डे आयु.धनंजय साळवे आयु.बाळू जाधव आयु.सिध्दार्थ धंदरे पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते या क्रिकेट प्रीमियर लीगच्या सामन्याची तारीख ४ एप्रिल ते ६ एप्रिल २०२५ अशी जाहीर करण्यात आली
