पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे मॅडम राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित.
संपादकीय
23 मार्च 2025 रोजी ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आय एम विनर स्पर्धा परीक्षा घेतली जाते याचा मूळ उद्देश देशांमध्ये महाराष्ट्र राज्याचा एम पी सी, यू पी सी, आय पी एस,आय ए एस मधील टक्का वाढवण्यासाठी व पायाभरणी म्हणून ध्येय प्रकाशन अकॅडमी यांनी आय एम विनर स्पर्धा परीक्षेचे आयोजन केलेले आहे.
तालुका, जिल्हा ,राज्यस्तरीय लेव्हल वरती स्पर्धा परीक्षा घेऊन त्याचे बक्षीस वितरण व पुरस्कर वितरण दरवर्षी केले जाते त्याचप्रमाणे 2025 मधील स्पर्धा परीक्षांमधील 200 गुणवंत विद्यार्थी ,पालक, शिक्षक ,यांचा सत्कार तसेच बक्षीस वितरण व कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील विठ्ठल तुपे नाट्य सभागृह हडपसर येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे साहेब हजर होते यांच्याहस्ते सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक मा.सुहास शेडगे सर तसेच अध्यक्ष सौ. अर्चना शेडगे मॅडम ,
मा.सोमनाथ शिंदे सर राज्य मार्गदर्शक, मा.संदीप पाटील सर राज्यप्रमुख ,सौ सोनाली गाडे राज्य सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे तसेच
मा. ज्योती कदम मॅडम उप जिल्हाधिकारी पुणे, राहुल आवारे साहेब पोलीस सहाय्यक आयुक्त स्वारगेट पुणे, अनिकेत गोरक्षनाथ थोरात सर सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर, डॉ.महेश पालकर साहेब संचालक (योजना) संचालनालय पुणे, डॉ.भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे ,संजय नाईकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे, श्वेता कुऱ्हाडे मॅडम कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरेखा भणगे मॅडम यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला त्यांचे जन्मगाव लोणी पवरा जवळ असलेले राजुरी हे आहे त्यांनी गरिबीशी झगडत गरिबीवर मात करून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले .व त्यांच्या जिद्दीने ,चिकाटीने , मेहनतीच्या जोरावर आज त्या आपल्या पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत अशा कर्तुत्वान महीला कर्तव्यदक्ष अधिकारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या पुरस्काराने राज्यभरातून विविध क्षेत्रातून, मित्रमंडळी, नातेवाईकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
