आरनास विंगस महिला बॉक्स क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 चे समापन.. अर्नास विंग्स टू फ्लाय फाउंडेशन तर्फे दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेज, बेसा येथील कॉलेजच्या मैदानावर दिनांक 21 ते 23 मार्च पर्यंत येथे अरनाज विंग महिला बॉक्स क्रिकेट चॅम्पियनशिप चे आयोजन केले होते ज्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 24 महिला क्रिकेट टीम जे 30 वर्षा पेक्षा जास्ती वयाच्या महिलांच्या टीम होत्या त्या सर्व महिलांनी आपल्या खेळाचे प्रदर्शन केले तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेटमध्ये 24 टीम चार कॉटर फायनल दोन सेमी फायनल आणि एक फायनल अशा 32 मॅच खेळण्यात आल्या ज्यामध्ये प्रथम पुरस्कार स्पोर्ट बर्ड्स टीमने जिंकला त्यामध्ये त्यांना 31000 रोख आणि ट्रॉफी देण्यात आली तसेच द्वितीय पुरस्कार टीम छावा 21000 रोख व ट्रॉफी यांना देण्यात आला आणि तृतीय पुरस्कार गोल्डन विंग्स टीम 11000 रोख आणि ट्रॉफी देण्यात आली संपूर्ण बाहेरून आलेल्या टीमचा खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन आरनाज विंग फ्लाईंग फाउंडेशन ची टीम युनायटेड एंजल्स च्या वैशाली जाधव, तृप्ती दास आकांक्षा मानवटकर शैला उरकुडे आरती पवनीकर स्मिता नागपुरे आणि आर्या क्षत्रिय त्यांच्यातर्फे करण्यात आले तसेच महिला कॉमेंट्री हर्षिता चौरसिया यांनी केली तसेच चॅम्पियनशिप चे मुख्य प्रायोजक अंबिका फार्म्स बँक ऑफ इंडिया कार्तिक मार्ट यांचे विशेष योगदान होते तसेच विशेष सहकार्य अभिजीत क्षीरसागर मुकेश काळे योगेश पाटील राजेंद्र तिवारी सौरभ तिवारी सुजित वानखेडे यांचे विशेष योगदान होते संपूर्ण मॅनेजमेंट राहुल इव्हेंट्स यांनी केले अर्धाच फाउंडेशन तर्फे पेड लगाव पृथ्वी बचाव या अंतर्गत पाहुण्यांचे स्वागत झाडाचे रोपटे देऊन करण्यात आले आरनाज विंग्स टू फ्लाय फाउंडेशनच्या संस्थापिका आर्या क्षेत्रीय यांनी समाजातील सर्व गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले
