वकिल व डॉक्टर यांच्या घरातून दागिने व पैसे चोरल्याप्रकरणी एकास अटक. नागपूर येथील घटना
नागपूर:दिनांक 19मार्च 2025 अडव्होकेट. मीना महेंदकुमार वर्मा यांचे वडील श्री महेंद्रकुमार वर्मा वय (80)वर्ष व त्यांचे भाऊ हे राहत असून महेंद्र कुमार वर्मा हे वयोवृद्ध असून त्यांची प्रकृती ठीक राहत नसून ते नेहमी व्हीलचेअर वर असतात. त्यांची काळजी. व देखभाल करण्यात करिता केअर टेकर म्हणून रामकिशोर उर्फ बबलू दशरथ प्रसाद चौकशे वय 43 वर्ष यास मागील आठ वर्षपासून वडिलांची सेवा करण्याकरिता नौकरीस ठेवले होते. तो रोज रात्री घरीच थांबतो व सकाळी 06:00 वाजता घरी जातो.
दिनांक 19 मार्च 2025 रोजी सकाळी ६:०० वा घरातील सगळे सदस्य झोपले असंतांना
घरातील ८० वर्षीय वयोवृध्द महेंद्र वर्मा यांच्या गळयातील २५ ग्रॅमचा सोन्याचा गोप व त्यासोबत असलेले ५ ग्रॅमचे लॉकेट जुने वापरते किंमत अंदाजे १,८०,०००/- रूपयाचा व त्यांचे जवळील पर्स ज्यामध्ये ५००० रूपये नगदी असा मुददेमाल जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन गेला अशा माहीतीवरून पोलिसांनी गुन्हयाने गांभीर्य लक्षात घेवन तात्काळ तपासपथकासह घटनास्थळी भेट दिली असता परीसरातील शासकीय व खाजगी असे एकूण जवळपास ७० कॅमेरे चेक केले. एक इसम पायदळ दिसून आल्याने त्याचा कॅमेराद्वारे पाठालाग करीत सक्करदरा येथे गेले असता तीथे स्थानीक गूप्तहेर यांना फूटेजमधील इसमाबाबत माहीती देवून विचारपूस केली व वरील नमूद वर्णनाचा इसम हा विदर्भ बूनीयादी शाळेजवळील पूरूषोत्तम किराणा दुकान नारायण झाडे यांचे घरी राहत असल्याबाबात माहीती मिळाली. त्याचे मोबाईल लोकेशन घेवून तांत्रीक मदतीच्या आधारे सदर इसम हा प्रशांत बार मानेवाडा रोड येथे असल्याचे कळले तिथे जावून सापळा रचून शिताफिने त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानी आपले नाव ओमप्रकाश दुमदेव निकोरे वय २१ वर्ष रा. प्लॉट नं. २३७, नारायण झाडे याचे घरी किरायाने, ओम नगर, पो. स्टे. सक्करदरा हद्दीत नागपूर असे सांगीतले त्यास पोलीस ठाणे हूडकेश्वर येथे आणून त्यास विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तपासादरम्यान तो अडव्होकेट मिना महेंद्कुमार वर्मा यांचे विघ्नहर्ता हॉस्पीटल मानेवाडा रोड.येथे काम करीत असल्याचे समजले तपासादरम्यान त्याचेकडून गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल गळयातील २५ ग्रॅमचा सोन्याचा गोप व त्यासोबत असलेले ५ ग्रॅमचे लॉकेट किं. अं. १,८०,०००/- रूपयाचा व त्यांचे जवळील पर्स ज्यामध्ये ५००० रूपये नगदी असा एकूण १,८५,०००/- रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
सदर गुन्हा हा ४८ तासात उघडकीस आणून गुन्ह्यातील १००% मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस उप आयुक्त मा. रश्मीता राव एन. परीमंडळ क ४, नागपूर शहर व सहायक पोलीस आयुक्त मा. नरेन्द्र हिवरे, अजनी विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. हुडकेश्वर चे वरीष्ठ पोलीस नीरीक्षक श्री. ज्ञानेश्वर भेदोडकर, स.पो.नि. ओमप्रकाश भलावी व तपास पथकामील अंमलदार यांनी केली आहे.
