अन्न सुरक्षा आणि हळदीसाठी बाजार संपर्क कार्यक्रम उत्साहात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर,दि. 23 : अन्न सुरक्षा आणि हल्दीसाठी बाजार संपर्क हा एक दिवसीय कार्यक्रम शहरातील सेंटर प्राईट हॉटेल येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी राष्ट्रीय हळद मंडळाचे अध्यक्ष पल्ले गंगाधर रेड्डी होते. स्पाइसेस बोर्ड इंडियाच्या सचिव पी. हेमलता, श्रीमती एन भवानी, भारतीय वन सेवेचे अधिकारी किशोर मानकर, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पंचभाई, डॉ. मनिष मोंघे, वैज्ञानिक-सी, स्पाइसेस पार्कचे डॉ. भारत गूडदे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री पल्ले गंगाधर रेड्डी यांनी बाजारविकास व गुणवत्ता वृद्धीमध्ये बोर्डच्या धोरणात्मक भूमिकेवर भाष्य केले.
त्यांच्या भाषणात श्री रेड्डी यांनी नॅशनल टर्मरिक बोर्डच्या वचनबद्धतेवर भर दिला.
या एक दिवसीय कार्यक्रमात पहिल्या सत्रात हळदीच्या ब्रँडींग आणि मार्केटींग विषयावर डॉ. पंचभाई यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात हळदीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती डॉ. मनिष मोंघे यांनी दिली. डॉ. ममता धनकुटे यांनी हळदीचे उत्पादन सुधारणा, गुणवत्ता वृद्धी आणि निर्यात वाढ यावर स्पाइसेस बोर्डच्या धोरणात्मक हस्तक्षेपांवर एक उपयुक्त सत्र घेतले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पल्ले गंगाधर रेड्डी व मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास कृषी क्षेत्रातील तज्ञ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
