एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस स्टेशन रामनगर येथे शांतता समिती तथा सर्वधर्मीय बंधू भगिनींची बैठक संपन्न.

पोलीस स्टेशन रामनगर येथे शांतता समिती तथा सर्वधर्मीय बंधू भगिनींची बैठक संपन्न.

प्रतिनिधी गणेश तारू

चंद्रपूर(वि.प्र.): महाल नागपूर जिल्हा नागपूर येथे दिनांक 17 मार्च 2025 रोजी घडलेल्या जातीय घटना संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील जातीय सलोखा तथा कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन पूर्णपणे प्रयत्नशील असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कायदा व सुव्यवस्था आबाजी तर ठेवण्याचे संदेश पोहोचविण्यासाठी वेळोवेळी अनेक सर्व धर्मीय बांधवांसोबत बंधू-भगिनींसोबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिलेले असून जिल्हा चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अनेक बैठकीचे आयोजन केले जात असून जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक बैठक संपन्न झाल्या असून पुन्हा पोलीस स्टेशन रामनगर येथे रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांच्या नेतृत्वात दिनांक 22/03/ 2025 रोजी ७.१५ वा. शांतता समिती तथा सर्वधर्मीय बंधू भगिनींची, संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडली.

या बैठकीत नागपूर येथे घडलेल्या घटना संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम ठेवावा, सोशल मीडियावर आलेली कुठलीही पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओवर विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून खात्री केल्याशिवाय ती इतर ग्रुप वर प्रसारित करू नये, तसेच त्यावर वेळीच रिऍक्ट न होता यासंदर्भात पोलिसांशी संपर्क करावे.

कोणत्याही संशयास्पद घटना संदर्भात वेळीच डायल 112 वर तसेच सायबर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजून कोणत्याही अफवेच्या आहारी न जाता पसरलेल्या अफवेचे किंवा पोस्टाची खातरजमा केल्याशिवाय अशा आक्षेपार्ह मजकूर/ पोस्टला फॉरवर्ड करू नये असे आवाहन देखील याप्रसंगी करण्यात आले.

रमजान महिना तसेच पुढील सन उत्सवाच्या काळात कुठल्या परिसरात पोलीस पथक, बंदोबस्त पेट्रोलिंग पाहिजे असल्यास तसे जवळच्या पोलीस स्टेशनला सुचित करण्यात यावे असे देखील या बैठकीत सांगण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक कायम ठेवण्यासाठी शहरात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा कायम ठेवण्याचे देखील आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

या बैठकीला चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य प्रवीण खोब्रागडे, जिल्हा शांतता समिती सदस्य बापू अन्सारी, शांतता समिती सदस्य दर्शन बुरडकर, शांतता समिती सदस्य मोरेश्वर खैरे, हिंदू जागरण मंचचे संयोजक विकास सोनकुसरे, शांतता समिती सदस्य ताजुद्दीन शेख, तुकूम येथील प्रतिष्ठित सलाउद्दीन शेख, गुलजार खान पठाण, माजी नगरसेवक विना खनके, माजी नगरसेवक सकीना अन्सारी, डॉ. ॲड. रुबीना मिर्झा,
डॉ.जाकीर हुसेन क्रीडा मंडळ चे सचिव मोहम्मद युसुफ कुरेशी, युवाशक्ती संघटनेचे योगेश मुंजेकर, भिवराज सोनी, सागर चोरपगार, कैलास चोरपगार, मोईनुद्दीन शेख,
राबिया खान, अनेक महिला भगिनी सह विशेष शाखेचे राजू अर्वेल्लीवार, दिनेश वाकडे सह अनेक बंधू भगिनींचीही या बैठकीत बहुसंख्येने उपस्थिती होती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link