चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती, सर्वधर्मीय बंधू भगिनींची बैठक संपन्न.
प्रतिनिधी संजय धर्मे
चंद्रपूर(वि.प्र.): महाल नागपूर जिल्हा नागपूर येथे दिनांक 17 मार्च 2025 रोजी घडलेल्या जातीय घटना संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील जातीय सलोखा तथा कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन पूर्णपणे प्रयत्नशील असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे संदेश पोहोचविण्यासाठी व जातीय सलोखा कायम रहावा या करिता वेळोवेळी अनेक सर्व धर्मीय बंधू-भगिनींसोबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जिल्हा चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अनेक बैठकीचे आयोजन केले जात असून जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक बैठका संपन्न ही झाल्या असून पुन्हा पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात दिनांक 22/03/ 2025 दुपारी ४.३० वा. शांतता समिती तथा सर्वधर्मीय बंधू भगिनींची, संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडली.
या बैठकीत नागपूर येथे घडलेल्या घटना संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम ठेवावा, सोशल मीडियावर आलेली कुठलीही पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओवर विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून खात्री केल्याशिवाय ती इतर ग्रुप वर प्रसारित करू नये, तसेच त्यावर वेळीच रिऍक्ट न होता यासंदर्भात पोलिसांशी संपर्क करावे. असे आवाहन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी केले.
कोणत्याही संशयास्पद घटना संदर्भात वेळीच डायल 112 वर तसेच सायबर पोलीस स्टेशनच्या 8888511911 या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजून कोणत्याही अफवेच्या आहारी न जाता पसरलेल्या अफवेचे किंवा पोस्टाची खातरजमा केल्याशिवाय अशा आक्षेपार्ह मजकूर/ पोस्टला फॉरवर्ड करू नये असे आवाहन देखील याप्रसंगी चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी केले.
रमजान महिना तसेच पुढील सण उत्सवाच्या काळात कुठल्या परिसरात पोलीस पथक, बंदोबस्त पेट्रोलिंग पाहिजे असल्यास तसे जवळच्या पोलीस स्टेशनला सुचित करण्यात यावे असे देखील या बैठकीत सांगण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक कायम ठेवण्यासाठी शहरात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा कायम ठेवण्याचे देखील आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य प्रवीण खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य बोबडे सर, शांतता समिती सदस्य बंडू धोत्रे, हिंदू जागरण मंच संयोजक विकास सोनकुसरे, शहर शांतता समिती सदस्य अजय वैरागडे, प्रशांत हजबन, दर्शन बुरडकर, मोरेश्वर खैरे, गुलजार खान पठाण, अब्दुल राशेद, सलीम मामू, महादेव कांबळे, सौ अनुराधा जोशी, श्रीमती खाडीलकर, विशेष शाखेचे सुजित बंडीवार, लक्ष्मण रामटेके सह अनेक बंधू-भगिनी यांची या बैठकीत उपस्थिती होती.
