म्हसावद येथे स्वच्छता प्रभात फेरीचे आयोजन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२४-२५ अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक पं. ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद शाळेच्या वतीने *स्वच्छ म्हसावद- सुंदर म्हसावद* या उपक्रमांतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन केले.
स्वच्छता उपक्रमांतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. डी. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी “स्वच्छ म्हसावद -सुंदर म्हसावद” असा संदेश देत लक्ष्मी माता मंदिर परिसर तसेच म्हसावद रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता केली .
स्वच्छता रॅलीत शाळेचे मुख्याध्यापक पी.डी. चौधरी सर ,एन. ए .पाटील सर, के. बी. पाटील मॅडम, एस. व्ही.. दुकळे सर, शिक्षकेतर कर्मचारी सोपान श्रावणे व शाळेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले.
