एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आमदार लोणीकरांनी विधानसभेत फॉरेस्ट विभाग व सामाजिक वनीकरणाचा काळा कारभार बाहेर काढताच फॉरेस्ट विभागाकडून कारवाईला सुरुवात

आमदार लोणीकरांनी विधानसभेत फॉरेस्ट विभाग व सामाजिक वनीकरणाचा काळा कारभार बाहेर काढताच फॉरेस्ट विभागाकडून कारवाईला सुरुवात

प्रतिनिधी नामदेव मंडपे जालना.

परतुर येथील शेख खालिक शेख अब्दुल्ला यांच्या मालकीच्या लोकसेवा सॉ मिल वर फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली असून, त्यांच्याकडे कडुलिंब वड उंबर पिंपळ आदी प्रजातीच्या लाकडांचा अवैध साठा आढळून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते
या संदर्भातील अधिक वृत्त असे की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत फॉरेस्ट विभाग व सामाजिक वनीकरण ची लक्तरे वेशीवर टांगताना सांगितले की, फॉरेस्ट विभागातील व सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र घटलेले असून त्यामुळे जिल्ह्याची वाळवंट झाला असल्याचा आरोप करताना वड पिंपळ कडूनिंब आपटा यासह 51 जातीच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला
पुढे बोलताना ते म्हणाले की, मिल मालक स्वतःची ट्रक ट्रॅक्टर पाठवून गावागावातील विविध प्रकारच्या झाडांची तोड करतात त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याबरोबरच जालना जिल्ह्यात पर्जन्यमान घटलेले आहे याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असून, पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते यातून घरातील किडूक मिडूक विकून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते त्यामुळे फॉरेस्ट विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात वनमंत्री कारवाई करतील काय असा सवाल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला
राणी वाहेगाव , सुरूगाव, मंठा या सह 12 ठिकाणी सामाजिक वनीकरण च्या वतीने अटल घनवन विकसित करण्यात आले होते यासाठी प्रत्येकी 30 लाख रुपयांचा खर्चही शासनाने केला होता मात्र यापैकी, राणी वाहेगाव येथील अटल घन वनातील 30 हजार वृक्षांची कत्तल करून ती वृक्ष तोडून टाकण्यात आल्याने सामाजिक वनीकरण चे अधिकारी झोपा घेतात काय असा सवाल आमदार लोणीकर यांनी विधानभवनामध्ये उपस्थित केला
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभाग झाडांची लागवड करत असतो त्यावर सरकार मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करते मात्र तात्पुरते झाडे लावून जवळपास त्याच्या नावाखाली खोटा खर्च उचलत सामाजिक वनीकरण चे तालुका जिल्हा स्तरावरील अधिकारी आपली उखळ पांढरे करतात त्यामुळे वृक्ष लागवडीचा फायदा होत नसल्याचे आमदार लोणीकर यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले
याबाबत आमदार बबनराव लोणीकर यांनी विधान भावनांमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर फॉरेस्ट विभागा ला खडबडून जाग आली असून परतूर तालुक्यातील लोकसेवा मिलवर त्यांनी कारवाई केली असून मंठा तालुक्यात काही अवैध वृक्षतोड करून आणणारी ट्रॅक्टर पकडले आहेत मात्र अशा प्रकारच्या जुजबी कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांना वनमंत्र्यांनी कारवाई करून पदच्युत करावी अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे
वृक्ष अधिनियम 1964नुसार वन गुन्हा क्रमांक t – 02/2025 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैधरित्या महाराष्ट्र वन अधिनियम डावलत विविध प्रकारच्या निसर्गातील महत्त्वाच्या अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून अशा प्रकारचा काळा धंदा करणाऱ्या शेख खालीक यांच्या लोकसेवा मिलवर दिनांक 21 रोजी वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर येथील श्री प्रमोद चंद लाकरा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक श्री एन एस मुंडे व वनपरिक्षेत्र अधिकारी पीएम दौंड यांच्या नेतृत्वात वनपाल विकास अवचार कु आर बी बनसोडे के बी वाकोदकर एम एम डब्ल्यू सय्यद बीजी पवार वनरक्षक वन मजूर श्री आत्माराम राठोड यांनी ही कारवाई केली असून लोकसेवा मिल च्या माध्यमातून अवैध वृक्षांची कत्तल करणे निसर्गाला हानी पोहोचवणे अशा प्रकारचे गोरख धंदे केले जात असल्यामुळे ही कारवाई झाली असल्याचे फॉरेस्ट विभगा कडून समजते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link