महाराष्ट्र अंनिसचे मेळघाटामध्ये अघोरी उपचार विरोधी अभियान.
प्रतिनिधी ज्योस्टणा करवाडे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आरोग्य विभाग अमरावती जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाटामध्ये उपचाराच्या नावाखाली केले जाणाऱ्या अघोरी डागण्या (डंबा) प्रथा बंद करण्याविषयी ची प्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. १७ मार्च ते ३१ मार्च पर्यंत चालणाऱ्या
या प्रबोधन यात्रेला जिल्हा परिषदेच्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार श्री विजय लोखंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहिमेची सुरुवात केली.
त्यापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या ॲड. मुक्ता दाभोलकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन वंदन केले.
या मोहिमे सविस्तर माहिती सांगताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की आदिवासी पाड्यांवर आरोग्य व्यवस्था अतिशय बिकट स्थितीमध्ये आहे. त्यामध्ये सुधारणा होण्यास वेळ लागेल परंतु तोपर्यंत डंबा देण्याच्या अघोरी प्रथांना पायबंद घालण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.
या मोहिमेचा हा पंधरा दिवसांचा पहिला टप्पा आहे. तीन टप्प्यांमध्ये ही मोहीम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री भगवान रणदिवे, श्रीकृष्ण धोटे व शासनाचा एक प्रतिनिधी या संपूर्ण दौऱ्यामध्ये असणार आहे. आदिवासींच्या वाड्यावस्त्या वर मध्ये जाऊन या अघोरी प्रथांबाबत माहिती देऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न करु
असे नंदीनी जाधव यांनी सांगितले.
या या मोहिमेला शुभेच्छा देण्याकरिता राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख मुंबई , नरेंद्र कांबळे वर्धा, नागपूर पश्चिम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ विकास होले , विजयाताई श्रीखंडे, आधार फाउंडेशनचे श्री प्रदीप बाजड, श्री वसंत भाकरे , रक्तदान समिती अमरावती चे उमेश पाटणकर, व्हिजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटना मुंबई अध्यक्ष प्रा डॉ प्रमोद वानखडे, कॉम्रेड सुभाष पांडे , श्री मुन्ना सवई यांच्यासह इतरही सामाजिक संघटनांचे अनेक प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.
