एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भगत सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांचे थोडे विचार आत्मसात करूया…..

भगत सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांचे थोडे विचार आत्मसात करूया…..

ठाणे प्रतिनिधी : दौलत सरवणकर

भगत सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांचे थोडे विचार आत्मसात करूया.
भगत सिंह देशासाठी फासावर चढले हेच आपण जाणतो,पण ते एक समाज सुधारणावादी, विज्ञानवादी,विचारवंत, अभ्यासु व्यक्ती सुद्धा होते..

बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना ‘आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले “मी निरीश्वरवादी का?” हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.

समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.

समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.

हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरों के कंधोंपर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हैं.
भगतसिंगाने १७ व्या वर्षी लिहिलेल्या “विश्वप्रेम’ या लेखात विश्वबंधुत्वाचा प्रसार करणाऱ्यामध्ये अमेरिकन-फ्रेंच राज्यक्रांती, मॅझिनी-गॅरिबाल्डी, म. गांधी यांच्याबरोबर तो लेनिनचा उल्लेख करतो. “लेनिन होता विश्वबंधुत्वाची बाजू उचलून धरणारा…”असे म्हणत तो स्पष्ट करतो, की “विश्वबंधुता! याचा अर्थ मी जगामध्ये समानता (साम्यवाद, World wide Equality in the true sense) याशिवाय दुसरे काही मानत नाही.’ भगतसिंगने स्वतःच म्हटल्याप्रमाणे पुढील काही वर्षे त्याने विविध क्रांती आणि विचारसरणींचा अभ्यास केला. त्यात लेनिनचेही वाचन केले. आधी “गांधीवादी राष्ट्रवादी’, मग “स्वप्नाळू क्रांतिकारी’, अल्पकाळ “अराज्यवादी साम्यवादी’ असलेले आपण शेवटी “मार्क्‍सवादी-शास्त्रीय समाजवादी’ झालो असे तो स्पष्ट नमूद करतो.
१९३० मध्ये लाहोर कट खटल्यात कैदी असताना भगतसिंह-दत्त यांनी लेनिन दिनानिमित्त (जानेवारी) न्यायाधीशांमार्फत मास्कोला पाठवलेल्या तारेत म्हटले होते : “सोव्हिएत रशियात होत असलेला महान प्रयोग व साथी लेनिन यांचे यश याना पुढे घेऊन जाण्यासाठी मन:पूर्वक सदिच्छा पाठवत आहोत. आम्ही स्वतःला जागतिक क्रांतिकारी आंदोलनाचा भाग म्हणून जोडून घेऊ इच्छितो. “या काळात अगदी न्यायालयासह सर्व माध्यमांतून भगतसिंगांनी देशभर लोकप्रिय केलेल्या तीन घोषणा होत्या : “साम्राज्यवाद मुर्दाबाद’, “सर्वहारा झिंदाबाद’ आणि “इन्किलाब झिंदाबाद’. या तिन्ही घोषणांमागील प्रेरणा जशी रशियातील कष्टकरी जनतेने केलेली क्रांती होती तशीच लेनिन यांनी आधुनिक साम्राज्यवादाचे आणि क्रांतिकारी व्यूहरचनेचे केलेले मूलगामी विश्‍लेषण हेदेखील होते.
फाशीच्या दोन दिवस आधी, कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांनी काही हवे का असे विचारले, तेव्हा भगतसिंहाने त्यांना एक पुस्तक आणून देण्याची विनंती केली. तसे त्यांनी ते दिले. फाशीची वेळ झाल्यावर तुरुंग कर्मचारी जेव्हा भगतसिंहाला न्यायला त्याच्या कोठडीजवळ आला तेव्हा भगतसिंह ते पुस्तक वाचत होता. त्याला उठवू लागताच भगतसिंह म्हणाला, “ठहरो, एक क्रांतिकारी की दुसरे क्रांतिकारी के साथ मुलाकात हो रही है.’ हातातील पान संपवल्यावर तो उठून म्हणाला, “चलो’. ते पुस्तक लेनिनचे चरित्र होते.

#स्वातंत्र्यवीर इन्हें कहते हैं। अंग्रेजो के पेंशन योजना का लाभ लेनेवाले पिठ्ठू को नहीं.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link