अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दिनांक २२/३/२०२५
प्रतिनिधी शंकर जोग पुणे
मेहतर वाल्मिकी महासंघाच्या वतीने
पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,
मेहतर वाल्मिकी समाजाच्या मालेगाव नगरपालिका शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी अजय श्रावण चांगरे यांना काही समाजकंटकांनी मारहाण करून करून जातीवाचक शब्द वापरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या अशा समाजकंटकांना ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी,
व या घटनेचा मेहतर वाल्मिकी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध करून या संदर्भाची निवेदन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना मेहतर वाल्मिकी समाज पुणे शहराच्या वतीने देण्यात आले होते,
यावेळी मेहतर वाल्मिकी महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष रवी परदेशी, महासचिव नरेंद्र इंद्रसेन जाधव, दिनेश अर्धाळकर, सचिन निंदाणे, सचिन सारवान, कनव चव्हाण, सुनील पिलाव, महेंद्र लालबिगे, सुनील कोटीयाना, रामलाल जाधव, बाबूजी बेद, सूरदास चव्हाण, विजू चंडालिया, आदि यावेळी उपस्थित होते
