आज दिनांक 21/03/2025 रोजी आंतरराष्ट्रीय जातीवाद विरोधी दिवसाचे औचित्य साधुन अवसरी खुर्द येथे मस्जिद समोरील अनेक वर्ष प्रलंबित असलेला रस्त्याचा वाद हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामोपचाराने व सलोख्याने मिटवला हा विषय मिटवण्यासाठी प्रामुख्याने मा.उपसभापती श्री संतोष शेठ भोर, सरपंच श्री वैभव पोपट वायळ, श्री ऊतम मारुती शिंदे, श्री प्रसाद खोललम ,योगेश खोललम, ओंकार शिंदे, अनिल शिंदे, ग्राम सदस्य, अमर मणेर,शरीफ मोमीन,याकुब मुलाणी, अनिस मोमीन,अलताफ मणेर,जमीर मणेर,सद्दाम मणेर,तौसिफ शेख,या सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले, यावेळी बोलताना सरपंच श्री वैभव वायळ यांनी दोन्ही समाजातील लोकांचे आभार मानले व भविष्यात अशाच प्रकारे जातीय सलोख्याचे संबंध ठेवावे अशी विनंती करून आंतरराष्ट्रीय जातीवाद विरोधी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ग्राम पंचायत अधिकारी जगन्नाथ शिदोरे हेही उपस्थित होते
