महा एनजीओ फेडरेशन कडून राजमाता जिजाऊ पुरस्काराने २५ महिला सन्मानित
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
15/03/2025 रोजी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये सेवा करणाऱ्या 25 महिलांना महा एनजीओ फेडरेशन पुणे यांच्याकडून *राजमाता जिजाऊ पुरस्कार* देण्यात आला. पर्यावरण व सामाजिक कार्याची दखल घेऊन मा. श्री शेखरजी मुंदडा (संस्थापक महा एनजीओ फेडरेशन, अध्यक्ष महाराष्ट्र गोसेवा आयोग) व स्वातीताई मुंदडा, मुकुंद शिंदे काका व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रेरणेने चालू केलेला हा सेवेचा प्रवास. माऊलींच्या, वृक्षांच्या आशीर्वादाने आणि सेवेने. तुम्हा सर्वांच्या साथीने राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त झाला.
मासाहेब जिजाऊंच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार विविध क्षेत्रात असणाऱ्या सर्व भगिनींसाठी सन्माननीय व अभिमानास्पद ठरला.
महा एनजीओ फेडरेशनचे पुरस्कार मिळालेल्या भगिनीनी मनापासून आभार मानले.
संस्थेचे सदस्या रूपालीताई पाटील व श्रावणी पाटील यांनी पुरस्कार स्वीकारून मान्यवरांना बिया भेट दिल्या. माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ, शिवाजीनगर, पुणे येथे 15 मार्च रोजी अतिशय सुंदर नियोजनात पूर्ण कार्यक्रम पार पडला व महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या कार्याची ओळख आणि भेटीगाठी झाल्या.
जय जिजाऊ, जय शिवराय!
जय महाराष्ट्र
