थेपडे विद्यालयात विविध स्पर्धा “बक्षीस वितरण समारंभ” उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील थेपडे म्हसावद माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्याच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.चौधरी सर हे अध्यक्षस्थानी विराजमान होते .तसेच विचार मंचावर शाळेचे उपमुख्याध्यापक जी.डी.बच्छाव सर पर्यवेक्षक शके.पी.पाटील सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका नेवे मॅडम, जेष्ठ शिक्षक नेतकर सर, एस.सी. बाविस्कर सर ,ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख चिंचोरे सर व शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शालेय स्तरावर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांसोबत त्यामध्ये असणारे सुप्त गुण यांना चालना मिळावी म्हणून फनी गेम्स, विविध स्पर्धा ज्यामध्ये क्रिकेट ,कबड्डी तसेच वर्षभरामध्ये बौद्धिक ज्ञानावर आधारित विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये व स्पर्धा परीक्षेमध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शारीरिक खेळाला महत्त्व दिले पाहिजे .ज्यामुळे आपली शारीरिक वाढ ही व्यवस्थित होते. खेळ प्रकारामध्ये आपण आपलं स्वतःचं करियर घडवू शकतो, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध खेळाडूंचे दाखले देत विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व विकास कसा करावा यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
एस. जे. पवार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.
