अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांना टाटा स्ट्राईव्हच्या
माध्यमाने अल्प मुदतीचे आर.पी.एल.कौशल्य प्रशिक्षण संपन्न
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
दिनांक 21.03.2025मा.श्री, सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक,कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ.जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पूर्व विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील पुरुष व महिला बंद्यांना टाटा स्ट्राईव्ह संस्थाच्या माध्यमाने अल्प मुदतीचे मल्टी-कुयझीय कुक व हाऊसकिपिंग सर्व्हिसेस चे कौशल्य प्रशिक्षण संपन्न झाले.
सदरील आर.पी.एल अल्प मुदतीचे कौशल्य प्रशिक्षण दिनांक 19.03.2025 ते 21.03.2025 या तीन दिवस कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या महत्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये पुरुष व महिला बंद्यासाठी अनुक्रमे मल्टी-कुयझीन कुक Multi Cuisine Cook व हाऊसकिपींग (Housekeeping) बॅचचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंपाक घरातील अन्न सुरक्षा आणि स्वच्छता इत्यादीवर प्रात्यक्षिक मार्गदर्शन तथा इतर पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच महिला बंद्यासाठी स्वतंत्र हाऊसकिपिंग सर्व्हिसेस (housekeeping services) चे आयोजन करण्यात आले. यात पी.पी.टी. द्वारे विस्तृतपणे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक व व्यक्तिमत्व विकास इत्यादीवर विस्तृतपणे मार्गदर्शन व ज्ञान देण्यात आले. सदरील प्रशिक्षणामध्ये 30 पुरुष व 30 महिला महिला बंद्यांनी सहभाग घेतलेला होता. असे एकूण 60 बंदयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आर.पी.एल. प्रशिक्षणावेळी मार्गदर्शन करतांना कारागृह अधीक्षक श्री. वैभव आगे यांनी बंदयांना मार्गदर्शन केले. मल्टी-कुयझीन कुक व हाऊसकिपींग अल्प मुदतीच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या बंद्यांना उत्तम दर्जाचे कौशल्य प्रशिक्षणासह त्यांना कौशल्य विभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे बंदयांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित असे करिअर विषयक सल्ला-मार्गदर्शन व संधी उपलब्ध होणार आहे. तसेच संबंधित व्यवसाय व व्यवस्थापनातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने याचा मोठा लाभ बंद्यांना होणार आहे. यातूनच कौशल्य प्राप्त उमेदवारांना कारागृहातून मुक्त झाल्यावर रोजगार व गरजू संबंधित उद्योगांना उमेदवार मिळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. अशा आशावाद श्री.वैभव आगे यांनी व्यक्त केला.
सदरील कौशल्य प्रशिक्षण श्री. वैभव आगे, अधीक्षक, श्रीमती दिपा वैभव आगे, अति. अधीक्षक, श्री.श्रीधर काळे, उप-अधीक्षक, श्री.आनंद पानसरे, वरिष्ठ तुरुंगअधिकारी, श्री.योगेश खिराळे, केंद्र व्यवस्थापक, टाटा स्ट्राईव्ह, श्री.राजू सोनेकर, केंद्र समन्वयक टाटा स्ट्राईव्ह, श्री. सुमीत डाब्रासे, श्रीमती काजल भरतवाडे, श्रीमती रीना मारोतकर,प्रशिक्षक टाटा स्ट्राईव्ह, इत्यादी प्रामुख्याने उपस्थितीत होते.
सदरील कौशल्य प्रशिक्षणाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी या कार्यालयातील प्रयास- टाटा सामाजिक विज्ञान, मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते कु.मीना लाटकर, श्री.कृष्णा पाडवी, श्री.धनपाल मेश्राम व श्री.लक्ष्मण साळवे, कारागृह शिक्षक श्री. संजय जाधव, हवालदार यांनी विशेष सहकार्य केले.
