अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवजयंती उत्सवाचा थाट! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक कळव्यातून दणक्यात निघाली.
ठाणे जिल्हा प्रतिनिधी :- दौलत सरवणकर,
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कळवा यांच्या शिवजयंती कार्यक्रमात नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद, देवीचा जागरण गोंधळाचा विशेष आकर्षण.
सोमवार, दिनांक :- 17 मार्च 2025 रोजी हिंदू वर्ष तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा फाल्गुन शुक्ल तृतीया, शके 1946 नुसार कळव्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कळवाच्या आयोजनाखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी चौक कळवा नाका येथून फटाक्यांच्या आतिषबाजीने मिरवणुकीला दणक्यात सुरुवात झाली. शिवसेना कळवा विभाग शाखेच्या वतीने ठिकठिकाणी थांबून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आणि पालखीला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये देवीचा जागरण गोंधळ विशेष आकर्षण ठरला. हा उत्सव आणि मिरवणुकीत शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख श्री. विजय शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष सहकार्य केले आणि तसेच इतर पक्षातील मान्यवर, नेते, पदाधिकारी, महिला आघाडी आणि सामान्य नागरिकांनी भरघोस सहभाग नोंदवला. लोकांचा उत्साह आणि गर्दी पाहता, हा उत्सव यंदाचा सर्वात यशस्वी ठरला.
सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी देखील उत्कृष्ट सहकार्य केले.
