अक्षरस्पर्ष ड्रीम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
संपादक संतोष लांडे
सामाजिक कार्यकर्त्या दीपाली ताई निखळ यांच्या अक्षरस्पर्ष ड्रीम स्कूलचा दुसरा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आण्णा भाऊ साठे येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्वलन करून झाली. नंतर विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या लहान चिमुकल्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षरस्पर्ष फाउंडेशनच्या
मतिमंद मुलांनी पण या विश्वाची आम्ही लेकरे या गाण्यावर उत्तम परफॉर्मन्स केला. सामाजिक कार्य करत असताना गरीब पालकांना इंग्लिश स्कूलची फि भरणे शक्य नसते हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः हिंमतीने अक्षरस्पर्ष ड्रीम स्कूल सुरू केले. कमी फि मध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण त्या मुलांना देत आहेत. आज या शाळेतील मुलामुलींनी खूपच सुंदर सादरीकरण केले. त्यांचा परफॉर्मन्स पाहून दीपाली ताई व सर्व शिक्षक यांची मेहनत दिसून येते. शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अतिशय सुंदर केले.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मा.अनिल रेळेकर, अभिनेत्री मेघना झुझम, वसुंधरा ग्रुपच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या योगिता गोसावी, इनर व्हीलच्या निशा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सुषमा कोंडे, लोकमत प्रतिनिधी अनिता म्हेत्रे, स्वप्न फाउंडेशनच्या वर्षा तांबोळी, सामाजिक कार्यकर्त्या सुषमा पंडित, सोफोश संस्थेच्या रजनी कलबुरगी, सोम फाउंडेशनच्या किर्ती कोकाटे व हर्षदा वाडेकर ई मान्यवर उपस्थित होते.
