वैदू समाजामध्ये उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल सत्कार सोहळा.
संपादकीय
भटक्यांचे आराध्य कुलदैवत अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथे श्री कानिफनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त* दरवर्षी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून हजारो संख्येने भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोक येत असतात.
सालाबाद प्रमाणे या ठिकाणी *वैदू समाजाचे समाज बैठक व कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविला जातो.* उत्सव्याचे अवचित साधून अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशन च्या *वतीने महाराष्ट्रातील आपल्या वैदू समाजातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व इतर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व विशेष कार्य कामगिरीबद्दल युवक, युवती,महिला व ज्येष्ठ मंडळींचा सत्कार संघटनेच्या मान्यवरांच्या हस्ते “स्मृतिचिन्ह व सन्मापत्रक” देऊन सत्कार करण्यात येणार आहे* . तरी आपण आपल्या गावातील, वस्तीतील जो कोणी विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केले असेल तर त्यांची नावे कळवावीत.
*गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या पुण्यभूमी मध्ये “सत्कार समारंभ कार्यक्रम” आयोजित केले आहे. तरी आपण सर्व वैदू समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे मार्गदर्शक पी.आय. श्री.दशरथ हाटकर,सचिव श्री.राजू लोखंडे व श्री.नारायण शिंदे माजी सरपंच व संघटनेचे कार्याध्यक्ष यांनी केले.
