झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य च्या पुणे जिल्हा सचिव पदी संजयभाऊ खंडारे यांची निवड.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
१५/०३/२०२५ रोजी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या पुणे जिल्हा सचिव पदी संजय खंडारे व अकोला जिल्हा सचिव सुनील वनारे यांची नियुक्ती कार्यकारी मंडळाच्या आदेशाने व संस्थापक अध्यक्ष कांता भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सामाजिक, आरोग्य, स्वच्छता , शिक्षण,पर्यावरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलची दखल घेऊन यांची नियुक्ती करण्यात आली.
समाजीक बांधिलकी आणि गरजु गोर गरीब लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना काम धंदा मिळवून देण्यासाठी झेप फाउंडेशन पुणे सर्व परी प्रयत्न करीत असते या उद्देशाने महिला सबलीकरण, महिलांना कामधंदा मिळावा, महिला
सशक्त बनल्या, पाहिजे उद्योजक झाल्या पाहिजेत ,या विचाराने कामं करीत आहेत व नेहमी काम करीत राहिल
म्हणूनच झेप फाउंडेशन पुणे चे बि्द वाक्य आहे जन सेवा हीच ईश्वर सेवा
