समूह पुनर्विकास प्रकल्पाचे प्रणेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे तसेच स्वप्नपूर्ती मा आमदार सदा सरवणकर यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी, किशोर रमाकांत गुडेकर
समूह पुनर्विकास प्राकल्प: नव्या पर्वाची भक्कम पायाभरणी ! ८०० कुटुंबांना मिळणार हक्काचे ५२५ कार्पेट चे मालकी हक्काचे घर, विश्वासाच्या पायावर उभे राहून, नव्या भविष्याकडे वाटचाल!
१६ मार्च २०२५ रोजी रवींद्र नाट्यमंदिर सभागृह, प्रभादेवी येथे सुगी डेव्हलपर्स तर्फे खेड गल्ली परिसर पुनर्विकास प्रकल्प क्र. २ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचे सादरीकरण करण्यात आले तसेच रहिवाशांना पुनर्विकास प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सुगी डेव्हलपर्स चे संचालक श्री. कर्णिक यांनी प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्याचे प्रभावी सादरीकरण केले.
सदर बैठकीला श्री. राहुल शेवाळे (माजी खासदार), श्री. सदा सरवणकर (अध्यक्ष – श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, राज्यमंत्री दर्जा)
श्री. समाधान सरवणकर (माजी नगरसेवक) मान्यवरांची उपस्थिती लाभली
