शासकीय बहुउदेशीय दिव्यांग संमिश्र केंद्राला भेट मधु ताराची
संपादकीय
दिनांक 18 मार्च 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी येरवडा पुणे येथील शासकीय बहुउदेशीय दिव्यांग संमिश्र केंद्राला भेट दिली.या वेळी केंद्राच्या अधीक्षक श्रीमती रोहिणीजी मोरे मॅडम यांनी मधु तारा प्रमुखांचे स्वागत केले या प्रसंगी मा.अधीक्षक संजीवनीजी वाघ मॅडम याही उपस्थित होत्या.आपल्या या शासकीय केंद्रात राज्य भरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत निवासी शिक्षण आणि 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण बाहेरून पण राहण्याची सोय इथेच केली जाते. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना लागणारे उपकरणे यांचीही सोय इथे केली जाते.असे केंद्राच्या अधीक्षक मोरे मॅडम म्हणाल्या.तसेचवर्धा.नाशिक.आंबेजोगाई.
सोलापूर.जळगाव या ठिकाणी ही शासकीय बहुउदेशीय दिव्यांग संमिश्र केंद्र आहेत असे म्हणाल्या.
या वेळी मधु तारा दिव्यांग सेवा या संस्थेने केंद्राला भेट दिली.आणि केंद्राची माहिती राज्यभर पोहचावी या साठी मधु तारा करीत असलेल्या* *कार्यासाठी मधु तारा प्रमुखांचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले.
या वेळी दिव्यांग पाल्यांचे पालक यांनी आपल्या पाल्यांना शिक्षणावाचून वंचित ठेऊ नये मोफत निवासी शिक्षणाचा लाभ आपल्या पाल्यांना द्यावा अस विनम्र आवाहन केले.
